हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 Ticket Booking – यंदा IPL चा 18वा सीझन 22 मार्चपासून सुरू होत असून , अनेक क्रिकेटप्रेमी जोरदार तयारीला लागले आहेत. या सीझनच्या पहिल्या सामना कोलकाता नाइट रायडर्स अन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. आयपीएलमध्ये असे 70 साखळी सामने खेळवले जाणार असून , हे सामने बघण्यासाठी अनेक चाहत्यांनी आयपीएल संघ , तिकीट , सीट्स निवडण्यास सुरुवात केली आहे. तुम्हालाही या सामन्यांचा आनंद हवा असेल तर तुम्ही देखील सोप्या पद्धतीने तिकीट बुक करू शकता .
आयपीएल संघ अन तिकीट पार्टनर्स (IPL 2025 Ticket Booking) –
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट
मुंबई इंडियन्स (MI) – बुक माय शो
गुजरात टायटन्स (GT) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) – बुक माय शो
राजस्थान रॉयल्स (RR) – बुक माय शो
पंजाब किंग्ज (PBKS) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट
सनरायझर्स हैदराबाद (SRH) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – बुक माय शो
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) – टिकट जेनी
दिल्ली कॅपिटल्स (DC) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट
तिकिटांची किंमत –
मुंबई इंडियन्स वानखेडेवरील सामन्याची कमीत कमी तिकीटाची किंमत 999 आहे.
केकेआरच्या सामन्यांची तिकिटं 990 पासून सुरू होतात. (IPL 2025 Ticket Booking)
गुवाहाटीमधील राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांची तिकिटं 1500 पासून सुरू होतात.
गुजरात टायटन्सचे तिकीट 499 रूपये आहे.
सनरायझर्स हैदराबादचे तिकीट 750 रूपये आहे.
पंजाब किंग्सचे तिकीट 1000 रूपये आहे.
प्लेऑफ आणि फायनल सामन्यांच्या तिकिटांची किंमत वेगळी असेल.
तिकिट बुकिंग (IPL 2025 Ticket Booking) –
तिकीट पार्टनरच्या वेबसाइट किंवा अँप –
वर दिलेल्या तिकीट पार्टनर्सच्या वेबसाइट किंवा अँपवर आपल्याला तिकीट बुकिंगची सुविधा मिळेल.
सामन्याचा आणि सीट श्रेणीचा पर्याय निवडा –
आपल्याला कोणत्या सामन्याचं तिकीट हवं आहे, ते निवडा. त्यानंतर, आपण सीट श्रेणी निवडू शकता, जी विविध भागांमध्ये विभागली जाते, आणि त्यानुसार किंमत ठरवली जाते.
पेमेंट करा –
सीट निवडल्यानंतर, पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात जसे की यूपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेट.
बुकिंग –
पेमेंट पूर्ण झाल्यावर, आपल्याला बुकिंगचा मेल किंवा मेसेज पाठवला जातो. (IPL 2025 Ticket Booking)