Rohit Sharma: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? पत्रकार परिषदेत केली मोठी घोषणा

0
2
Rohit Sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rohit Sharma – कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) फायनल सामन्यात दमदार विजय मिळवला. अन पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे पर्व दिले. पण काही दिवसांपासून रोहित शर्माचा हा शेवटचा वनडे सामना असणार आहे , अशा चर्चा होताना दिसत होत्या. त्यामुळे अनेक चाहते निराश झाले होते. पण आता रोहितने क्रिकेट संघाला अन चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर एक मोठी घोषणा केली आहे. तर ती कोणती घोषणा आहे, हे आज आपण पाहणार आहोत.

टीम इंडियाचा परफॉर्मन्स अन संघाची एकजूट (Rohit Sharma)

हा विजय टीम इंडियासाठी एक मोठे यश आहे , कारण या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप म्हटले जाते. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताना टीम इंडियाने दिलेला परफॉर्मन्स अन संघाची एकजूट याची चर्चा अख्या देशभरात सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ उदात्त भावना आणि उत्साहाने भरलेला असतानाच, अनेक जण असा अंदाज व्यक्त करत होते की, रोहित शर्मा (Rohit Sharma) कदाचित या ऐतिहासिक विजयाच्यानंतर आपल्या वनडे करिअरच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो. अखेर, या अफवांना पूर्णविराम देत रोहित शर्मा ने प्रेस कॉन्फरन्समध्ये याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालाय.

रोहित शर्माची निवृत्ती –

“माझ्या निवृत्तीच्या संदर्भात अनेक अफवा पसरत आहेत. मी हे स्पष्ट करतो की, मी सध्यातरी या फॉर्मेटमधून निवृत्त होणार नाही. अजून एक गोष्ट सांगायचीय … मी पुढील काही काळासाठी वनडे क्रिकेट खेळणार आहे,” असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला. याने सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनातील शंका दूर केल्या आणि त्याला पुढे खेळण्यासाठी प्रेरित केले.

महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या –

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वाची स्पर्धा जिंकली असली तरी, एकदाचं विश्वविजय होणं हा त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याला हा वर्ल्ड कप जिंकून आपलं क्रिकेट जीवन परिपूर्ण करायचं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आणखी काही महत्त्वाच्या विजयांमध्ये सामील होईल अशी आशा आहे आणि त्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतीय क्रिकेट टीमचे भविष्य उज्ज्वल दिसते.