हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 – इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) या सर्वात लोकप्रिय स्पर्धंच्या 18 व्या सीझनला आजपासून (22 मार्च) सुरुवात होत आहे. कोलकाता येथे रंगारंग उदघाटन सोहळ्यासह या स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. या स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी असणार आहे. पण या सामन्यादरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह मसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हि स्पर्धा सुरु होण्याआधी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी उसळी घेतली आहे, आयपीएल 2025 चे नवे नियम अन नवे कर्णधार याकडे क्रिकेट प्रेमींचे खास लक्ष असणार आहे. यामध्ये विशेषकरून कोणते नवे तारे झळकणार , प्रमुख दावेदार कोणता संघ ठरणार , अशा अनेक प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तर आजपासून सुरु होणाऱ्या आयपीएलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
IPL 2025 हंगामासाठी 10 संघ –
यंदाच्या आयपीएल 2025 (IPL 2025) हंगामासाठी 10 संघ सहभागी झालेत अन या 10 पैकी 9 संघानी भारतीय कर्णधाराने पसंती दिली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज म्हणजेच 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणार आहे. पहिला सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरू सायंकाळी 7.30 वाजता थेट प्रसारित केला जाणार आहे. हे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 , स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी अन JioHotstar अँपवर पाहता येणार आहे. यामध्ये नाणेफेकीची वेळ 7 वाजता असेल. डबल हेडर सामन्यांमध्ये दिवसाच्या सामन्यांची वेळ दुपारी 3.30 वाजता असेल, आणि नाणेफेकीची वेळ 3 वाजता असणार आहे.
अंतिम सामना कधी –
हि स्पर्धा 65 दिवस चालणार आहे , ज्यामध्ये एकूण 74 सामने खेळले जातील. अंतिम सामना 25 मे 2025 रोजी होणार आहे. हंगामाच्या प्लेऑफ सामने हैदराबाद अन कोलकाता येथे खेळवले जातील. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर क्वालिफायर-2 आणि अंतिम सामना, तर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामना होणार आहेत.
10 संघांसह ट्रॉफीसाठी लढत (IPL 2025) –
आयपीएल 2025 मध्ये 10 संघ सहभागी झाले असून , यामध्ये पॅट कमिन्सच्या (सनरायजर्स हैदराबाद) रूपात एकमेव परदेशी कर्णधार आहे. अन्य संघांचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज), अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स) शुभमन गिल (गुजरात टायटन्स), अजिंक्य रहाणे (कोलकाता नाइट रायडर्स), ऋषभ पंत (लखनऊ सुपर जायंट्स), हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स), श्रेयस अय्यर (पंजाब किंग्ज), संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स), रजत पाटीदार (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) या खेळाडूंकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या आयपीएल (IPL 2025) हंगामाच्या सुरुवातीला सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनात उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत.