हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्या प्रकरणी आता महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स बजावला आहे. याप्रकरणी त्यांना 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय टेलिग्राफी ऍक्ट कलम ३० माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43 व 46 तसेच ऑफिशियल सीक्रेट कलम 05 नुसार हे समन्स बजावण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या मदतीने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे.
Mumbai Police summons IPS officer Rashmi Shukla, asking her to join the investigation in the FIR registered at Cyber Cell police station in Mumbai in the 2019 phone tapping matter. She was heading State intelligence dept then. She has been asked to appear before them tomorrow.
— ANI (@ANI) April 27, 2021
काय आहे प्रकरण?
महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. दरम्यान एमएसआयडी मध्ये कार्यरत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहेत. असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलिस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते असा आरोप केला होता तसेच त्यांनी एका अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता एवढंच नाही तर याचा पुरावा केंद्रीय गृह सचिवांकडे देण्यात आला होता त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी केली असता लक्ष्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लिक झाल्याचे निदर्शनास आले होते एवढेच नाही तर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण त्याचा गैरवापर केला. शुक्ला यांनी रितसर फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणांमध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महा विकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहेत असा आरोप काही मंत्र्यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले आहेत.
शिरूर चे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकासआघाडी मध्ये न जाता भाजपबरोबर राहावे यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. दरम्यान आता रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले असून आता या प्रकरणी त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.