IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iQOO Neo 7 5G : आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. या दिवाळीच्या हंगामात नागरिकांकडून जोरदार खरेदी केली जाते. अशातच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनन्यांकडूनही अनेक ऑफर्स लाँच केल्या जात आहेत. याच काळात स्मार्टफोन कंपनी iQOO ने देखील आपला Neo 7 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा हा नवीन प्रीमियम डिव्हाइस असून जो IQOO Neo 6 5G चा अपग्रेड व्हर्जन आहे. या नवीन iQoo निओ सिरीज हँडसेटमध्ये 4nm MediaTek Dimensity 9000+ चिप आणि 120Hz रिफ्रेश रेटसह होल-पंच डिस्प्ले दिला गेला आहे. याशिवाय या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही देण्यात असून हा फोन ऑरेंज ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

iQOO Neo 7 5G Specifications Confirmed Ahead of October 20 Launch Event - MySmartPrice

हा नवीन iQOO Neo 7 5G फोन चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला असून त्याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत अंदाजे 30,900 रुपये, 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 34,300 रुपये, 12GB रॅम + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत अंदाजे 3299 रुपये, 12GB RAM + 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत अंदाजे 41,200 रुपये आहे.

iQoo Neo 6 SE Design Revealed as Pre-Reservations Begin, Teased to Pack 64-Megapixel Camera | Technology News

या फोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असेल. तसेच यामध्ये 6.78-इंचाचा फुल HD + E5 AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. फोनचा ब्राइटनेस 1500 nits आहे. जो ऑरेंज ब्लू आणि ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध आहे.

iQOO Neo 7 Expected to be Launched Soon in India: Launch Timeline, Features and Full Specs

iQOO Neo 7 5G फोन MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरद्वारे समर्थित होता, 12GB RAM आणि 512GB स्टोरेजसह जोडलेला होता. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

vivo iQOO Neo 6 Price in Malaysia & Specs | TechNave

कॅमेरा बाबत बोलायचे झाल्यास iQOO Neo 7 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे. याशिवाय यामध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://www.iqoo.com/in/products/iqoo7

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर