मोठी बातमी!! पाकिस्तानवर एअरस्ट्राईक; दहशतवादी स्थळांवर डागली क्षेपणास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. परंतु भारताने नव्हे तर इराणने हा एअर स्ट्राईक (Iran Air Strike On Pakistan) केला आहे. इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी गटाच्या तळांवर एअरस्ट्राईक (Air Strike) केल्याचा दावा केला आहे. इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाकिस्तानमधील बलुची दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला . इराणच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेल्या या दहशतवादी गटानं पाकिस्तानच्या सीमा भागांत इराणी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. जैश अल-अदल गटानं इराणच्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीनं हल्ला केल्याची माहिती जैश अल-अदल गटाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यात जैश अल-अदलच्या सैनिकांची घरं उद्ध्वस्त झाली. तसेच त्याचे कुटुंबीय सुद्धा गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या बेकायदेशीर उल्लंघनाचा निषेध केला आहे आणि इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.

इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुले ठार झाले असून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे हे उल्लंघन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या घटनेचे “गंभीर परिणाम” भोगावे होऊ शकतात असा इशारा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. दरम्यान, एकीकडे इस्रायल-हमास संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे, तर दुसरीकडे याचवेळी इराणनं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकमुळे खळबळ माजली आहे.