IRCTC App : मोबाईलवरच समजेल ट्रेन मधल्या रिकाम्या सीटसची माहिती ; फॉलो करा सोप्या स्टेप्स

IRCTC App
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC App : तुम्ही जर वारंवार ट्रेनचा प्रवास करत असाल तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. आता IRCTC App च्या माध्यमातून घर बसल्या ट्रेन तिकीट बुक करू शकतात. आयआरसीटी अ‍ॅप वर ‘Chart Vacancy’ नावाचे फीचर आहे. या फीचरच्या मदतीनं तुम्ही ट्रेनमध्ये असलेल्या रिकाम्या सीटची माहिती मिळवू शकता. जर तुमचा एखादा फिरण्याचा प्लॅन बनला असेल तर तिकीट बुक केलं नसेल तर ट्रेनमधील रिकामी सीटची माहिती मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

ट्रेनमधील रिकाम्या सीटची माहिती कशी मिळवाल ?

  • सर्वप्रथम IRCTC अ‍ॅप (IRCTC App) तुमच्या स्मार्टफोनमध्ये ओपन करा.
  • त्यानंतर अ‍ॅपमधील ‘Train’ आयकॉनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला ‘Chart Vacancy’ चा ऑप्शन दिसेल.
  • Chart Vacancy वर टॅप करा.
  • त्यानंतर तुमचं नाव आणि त्या ट्रेनचा नंबर टाका ज्यात तुम्हाला प्रवास करायचा आहे.
  • आता तुम्ही जिथून ट्रेन पकडणार आहेत त्या स्टेशनचे नाव टाका.
  • त्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनमध्ये असलेल्या रिकाम्या सीट्सची माहिती मिळेल.
  • विशेष म्हणजे आयआरसीटीसीच्या या ‘Chart Vacancy’ फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला IRCTC अ‍ॅपवर लॉग-इन करण्याची गरज नाही.

IRCTC वेबसाइटच्या माध्यमातून कशी पहाल सीट?

  • सर्वप्रथम IRCTC वेबसाइट ओपन करा.
  • होम पेजवर तुम्हाला Book Ticket बॉक्सच्या बाजूला “Charts/Vacancy” दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक करा, आता तुमच्या समोर “Reservation Chart” ओपन होईल.
  • त्यात आवश्यक माहिती भरा आणि Get Train Chart वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही ट्रेन मध्ये रिकाम्या सीट्सची माहिती मिळेल.