महाकुंभला जाण्याची तयारी करत असाल आणि तिथे राहण्याची व्यवस्था काय असेल याची काळजी वाटत असेल तर? अशा लोकांना ही बातमी उपयोगी पडू शकते. IRCTC ने संगमच्या काठावर राहण्याची व्यवस्था केली आहे. ती सुद्धा व्ही.आय.पी. यासाठी आजपासून बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आता उशीर करू नका. तुमच्या सोयीनुसार लगेच बुक करा आणि आरामात महाकुंभात स्नान करू शकता.
आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन यांनी सांगितले की, महाकुंभला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संगममध्ये टेंट सिटी तयार करण्यात येत आहे. ज्याचे नाव असेल महाकुंभ ग्राम. IRCTC टेंट सिटी प्रयागराज ही तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवीन ओळख बनणार आहे. हे लक्झरी टेंट सिटी सांस्कृतिक अनुभवाला भारतातील अध्यात्मिक विविधतेशी जोडून एक अनोखा अनुभव निर्माण करेल. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे.
किती असेल भाडे ?
आयआरसीटीसीचे संचालक (पर्यटन आणि विपणन) राहुल हिमालयन यांनी सांगितले की, टेंट सिटीमध्ये राहण्याचे भाडे प्रति रात्र 6000 रुपये (अधिक कर) पासून सुरू होते. डबल ऑक्यूपेंसी, नाश्त्यासह. ग्रुप डिस्काउंट उपलब्ध. रद्द केल्यावर श्रेणीबद्ध परतावा दिला जाईल.
कसे कराल बुकिंग ?
टेंट सिटीमध्ये बुकिंग करण्यासाठी https://www.irctctourism.com/ या लिंकवर जाऊन बुकिंग करता येईल. कस्टमर सपोर्ट व्हॉइस साठी 1800110139 हा क्रमांक आहे. याशिवाय, +91-8287930739, +91-8595931047, किंवा +91-8076025236 वर यासंबंधीची माहिती मिळू शकते.
टेंट सिटीची खासियत
- डिलक्स टेंट – आरामदायी शयनकक्ष, आधुनिक सुविधांसह स्नानगृह, गरम पाण्याची सुविधा.
- प्रीमियम टेंट – लाइव्ह इव्हेंट स्ट्रीमिंगसह अतिरिक्त एसी, एलईडी टीव्ही.
- चोवीस तास सुरक्षा आणि अग्निरोधक तंबू.
- आरामदायी डायनिंग हॉलमध्ये बुफे कॅटरिंग सेवा.
चोवीस तास वैद्यकीय सहाय्य. - प्रेक्षणीय स्थळे आणि आंघोळीच्या ठिकाणी शटल सेवा.
- इको-फ्रेंडली बॅटरी ऑपरेटेड कार्ट्स.
- योग/स्पा/बायकिंग सुविधा.
- एक्झिक्युटिव्ह लाउंज, भोजनालये आणि नदीच्या काठाजवळील घरातील पाहुण्यांसाठी शौचालये.
- चोवीस तास रिसेप्शन.