IRCTC : ‘या’ तारखेपासु सुरु होणार छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हेरिटेज ट्रेन ; ऐतिहासिक वारशाचा अनुभव देणारी खास सहल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC : भारतीय रेल्वेच्या भारत गौरव पर्यटक ट्रेन योजना अंतर्गत आयआरसीटीसी (IRCTC) ९ जून २०२५ पासून ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही खास हेरिटेज ट्रेन सेवा सुरू करणार आहे. सहा दिवसांची ही वैभवशाली यात्रा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुरू होईल आणि तिथेच समाप्त होईल. या दौऱ्यात पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचा सखोल अनुभव मिळणार आहे.

कोणकोणती ठिकाणं पाहता येणार?

या ऐतिहासिक यात्रेत रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, पुण्याचा लाल महाल व शिवसृष्टी, भीमाशंकर मंदिर, प्रतापगड किल्ला, कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ला अशा महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. ही सहल ५ रात्री आणि ६ दिवस अशी असेल. प्रवासात दादर आणि ठाणे येथेही बोर्डिंग आणि डिबोर्डिंगसाठी थांबे असणार आहेत.

प्रवासाची सुविधा आणि योजना

तुमच्या बजेटनुसार IRCTC ने तीन प्रकारचे टूर पॅकेजेस दिले आहेत:

  • इकोनॉमी (स्लीपर क्लास)
  • कम्फर्ट (3AC)
  • सुपीरियर (2AC)

या सर्व पॅकेजेसमध्ये हॉटेलमध्ये निवास, ट्रेन व बाहेर शाकाहारी जेवण, स्थानिक वाहतूक, मार्गदर्शक, प्रवेश तिकीट, प्रवास विमा आणि सुरक्षा यांचा समावेश आहे. ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) सहकार्याने राबवली जात आहे.

प्रशासनाचे मत

या उपक्रमाची माहिती देताना *संभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, “ही फक्त सहल नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याशी, दूरदृष्टीशी आणि मूल्यांशी जोडण्याची एक संधी आहे.” त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना आणि पर्यटकांना या अनोख्या ऐतिहासिक प्रवासाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

मुंबईत दिवसाही अंधार, सखल भाग पाण्याखाली, वाहतूक कोंडी कायम

इतिहास, भक्ती, शिक्षण एक आगळीवेगळी सफर

शिवकालीन किल्ल्यांचा भव्य इतिहास, धार्मिक स्थळांची भक्तिपूर्ण अनुभूती आणि संपूर्ण प्रवासातून मिळणारा ऐतिहासिक दृष्टिकोन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही ट्रेन केवळ पर्यटन नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा अनुभव आहे.९ जूनपासून सुरू होणाऱ्या या अद्वितीय रेल्वे सहलीसाठी लवकरात लवकर आरक्षण करा आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासात स्वतःला सामावून घ्या