प्रवासादरम्यान झोपेमुळे प्रवाशांचे स्टेशन चुकू नये यासाठी IRCTC ने सुरु केली खास सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : देशातील अनेक प्रवास करण्यासाठी रेल्वेलाच प्राध्यान्य देतात. रेल्वेदेखील प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक प्रकारच्या सुविधा देते. आताही रेल्वेने रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरु केली आहे, जिचे नाव आहे डेस्टिनेशन अलर्ट फॅसिलिटी. आता रात्री प्रवास करताना झोप आल्यास स्टेशन चुकण्याची चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण आता रेल्वे कडून आपले स्टेशन येण्याच्या 20 मिनिटे आधीच मोबाईलवर वेकअप अलार्म पाठवला जाईल. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा जास्त फायदा होणार आहे. कारण, झोपेमुळे अनेकदा प्रवाश्यांचे स्टेशन चुकले जाते.

Now passengers can 'sleep on trains' without worrying about leaving;  Railways offer wake-up alerts | DH Latest News, DH NEWS, Delhi, Latest  News, Travelmania, Travel & Tourism, India, NEWS, Tourism, Special ,

झोपेमुळे प्रवाशांचे स्टेशन चुकू नये यासाठी रेल्वेकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. तसेच या सुविधेसाठी प्रवाशांना अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागणार नाहीत. मात्र मेट्रो शहरांमधून कॉल करण्यासाठी यासाठी 1.20 रुपये प्रति मिनिट तर नॉन-मेट्रो शहरांसाठी 2 रुपये प्रति मिनिट दराने शुल्क आकारले जाईल. त्याचबरोबर SMS साठी 3 रुपये शुल्क आकारले जाईल. IRCTC

Destination Alert Wakeup Alarm Facility For Indian Railways Night  Travellers Soon

20 मिनिटांपूर्वी उठवेल अलार्म

हे लक्षात घ्या कि, रेल्वेतून रात्री प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचण्याच्या 20 मिनिटे आधीच मोबाईलवर एक वेक अप अलार्म पाठविला जाईल. जेणेकरून प्रवाश्यांना स्टेशनच्या 20 मिनिटे आधीच उठून ट्रेनमधून उतरण्याची तयारी करता येऊ शकेल. IRCTC

Indian Railway: ट्रेन चैन की नींद सो सकेंगे यात्री, स्टेशन आने से 20 मिनट  पहले बजने लगेगा अलार्म - indian railway news destination alert wake up alarm  for passengers in trains lbs - AajTak

अशा प्रकारे घ्या या सुविधेचा लाभ

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला मोबाइलवरून IRCTC चा हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करावा लागेल. यानंतर प्रवाशाला आपल्या आवडीची भाषा निवडण्यासाठी नंबर दाबण्यास सांगितले जाईल. यानंतर, वेकअप डेस्टिनेशन अलर्टसाठी 7 आणि नंतर 2 नंबर दाबावा लागेल.

यानंतर प्रवाशाला 10 अंकी PNR क्रमांक टाकावा लागेल. जो एंटर केल्यानंतर 1 नंबर दाबून त्याची पुष्टी करावी लागेल. यानंतर, प्रवाशाचे डेस्टिनेशन अलर्ट सेट केले जाईल. तसेच एसएमएस द्वारे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी फॉर डेस्टिनेशन अलर्ट करावे लागेल. यासाठी फोनवरून आणि ALERT<PNR Number> असे टाइप करून 139 वर पाठवावे लागेल. IRCTC

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctchelp.in/destination-alert-railway-passengers/

हे पण वाचा :
IDBI Bank च्या ‘या’ FD वर मिळेल 7.60% व्याज, जाणून घ्या अधिक तपशील
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
New Business Idea : जास्त भांडवलाची गरज नसलेल्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये, सरकारकडूनही मिळेल मदत
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदी महागली, नवीन दर तपासा