IRCTC : देशभरात फिरायला जाण्यासारखी भरपूर सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. लवकरच मुलांच्या शाळांना सुट्ट्या सुरु होतील या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठे फिरायला जायचा विचार करीत असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त पर्याय सांगणार आहोत. तुम्ही यंदाच्या सुट्टीत काश्मीरला फिरायला जाऊ शकता. काश्मीर ला पृथीवरचे स्वर्ग म्हंटले जाते. सुंदर बर्फाच्छादित डोंगर रांगा, दऱ्या , तलाव इथले निसर्गसौन्दर्य कधीही न विसरता येण्यासारखे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही टूर बजेटमध्ये करायची असेल तर (IRCTC) ने एक जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे चला तर मग जाणून घेऊया…
आय आर सी टी सी ने या टूर पॅकेजला (KASHMIR-HEAVEN ON EARTH EX COIMBRATORE असं नाव दिलं आहे. ही टूर पाच रात्र आणि सहा दिवसांची आहे. ही टूर 13 मार्चपासून कोईमतुर पासून सुरू होणार आहे. या टूरच्या अंडर ट्रॅव्हलिंग मोड हा फ्लाईट मोड राहणार असून कोईमतूर पासून श्रीनगर इंडिगो फ्लाईट ने तुमचा प्रवास होईल.
आय आर सी टी सी च्या या टूर पॅकेजमध्ये आपण गुलमर्ग, पहलगाम ,श्रीनगर, सोनमर्ग (IRCTC) या ठिकाणी भेटी देणार आहात. या पॅकेजमध्ये एकूण 29 जण समावेश करून घेतले जाऊ शकतात. या टूर पॅकेज मध्ये तुम्ही तीन रात्री श्रीनगर, एक रात्र पहलगाम आणि एक रात्र श्रीनगर येथील हाऊस बोट मध्ये राहणार आहात.
या टूर मधील जेवणाच्या बाबतीतले प्लॅन सांगायचे म्हटलं तर या पॅकेज मध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर मिळेल याशिवाय या टूर पॅकेज (IRCTC) मध्ये (IRCTC) कडून टू एस्कॉर्ट सर्विस सुद्धा मिळणार आहे.
एअर टूर पॅकेजच्या गोष्टीबद्दल सांगायचं झाल्यास तर सिंगल तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला 50150 रुपये खर्च होईल. तर डबल शेअरिंग मध्ये तुम्हाला 45 हजार 970 रुपये आणि ट्रिपल शेअरिंग मध्ये 44 हजार 760 रुपये इतका खर्च होईल. त्याच्याशिवाय पाच ते 11 वर्षांच्या मुलांसाठी जर बेड घेतला गेला तर सदतीस हजार तीनशे रुपये पाच ते अकरा वर्षाच्या मुलांसाठी बेड घेतला नाही तर 34920 आणि दोन ते चार वर्षाच्या मुलांसाठी बीड घेतला नाही तर तीस हजार पन्नास रुपये खर्च होतील. जर (IRCTC)ची ही टूर तुम्ही बुक करण्याचा विचार करत असाल तर आय आर सी टी सी च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा आणि तिथे तुम्ही ही टूर बुक करू शकता.