IRCTC Goa Package: गोव्याला जायचा प्लान करत आहात ? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे स्वस्तात, परवडणाऱ्या खर्चात तुम्ही गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे, विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावरील निसर्ग सौन्दर्याचा अनुभव घेऊ शकता. तेथील विविध अन्नपदार्थांचा स्वाद घेऊ शकता. IRCTC आयआरसीटीसी तुम्हाला ही संधी देत आहे. चला तर मग जाणून घेऊ IRCTC चे गोवा पॅकेज नेमके काय आहे ? पर्यटकांना नेमक्या कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
IRCTC ने या नवीन वर्षात म्हणजे 2024 च्या जानेवारी महिन्यात गोवा ट्रिप जी ‘न्यू इयर बोनान्झा इन गोवा’ पॅकेज या नावाने टूर पॅकेज चे आयोजन केले आहे. तुमच्या मित्रांसोबत ही सफर आनंददायक ठरू शकते. तेव्हा लवकरच ही आगळीवेगळी ट्रीप बुक करा . गोव्यात डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुट्टीमुळे अनेक हॉटेल्स बुक असल्याने अनेकांना त्या काळात पर्यटकांना गोवा प्रवासाची संधी मिळत नाही. गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेकजण जात असतात. गोव्यातील नाईट लाईफ आणि बीच कल्चर, पार्टी कल्चर पर्यटकांना नेहमीच आकर्षून घेते. नववर्षात गोव्याच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला IRCTC चा प्लान (IRCTC Goa Package) निवडून बुकिंग करावा लागेल.
कधी जाणार गोव्याला ट्रिप – IRCTC Goa Package
IRCTC नववर्षानिमित्त गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन ऑफर आणत आहे, जी स्वस्तही आहे आणि गोव्यात प्रवास करण्यासाठी, तेथील मजा अनुभवण्यासाठी महत्वाची आहे. IRCTC ने या गोवा टूरला ‘न्यू इयर बोनान्झा इन गोवा’ (EGA013B) असे कल्पक नाव दिले आहे. गोव्याची ही ट्रीप 22 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे. या टूरदरम्यान पर्यटक गोव्यातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेट देणार आहेत.
गोवा ट्रीपचा खर्च किती ?
IRCTC ने गोवा टूर पॅकेजच्या (IRCTC Goa Package) किमती सिंगल ते ग्रुपमध्ये विभागल्या आहेत. एका व्यक्तीला भाडे 47,210 रुपये असणार आहे, तर दोन व्यक्तींसाठी भाडे 36,690 रुपये आकारले जाणार आहे. 3 लोकांना गोवा टूरला जायचे तर प्रति व्यक्ती 36070 रुपये खर्च येणार आहे. तर 5 ते 11 दरम्यान वय असलेल्या मुलांना 35150 रुपये आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलांना 34530 रुपये खर्च आहे .IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत नमूद केले आहे.
नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या IRCTC च्या पॅकेजनुसार, ही ट्रीप फ्लाईटने होणार असून गुवाहाटीहून गोव्याला जाणार आहे. तसेच 5 दिवस पर्यटकांना ट्रीपसाठी सोयी व सुविधा मिळणार आहेत. प्रवासादरम्यान पर्यटकांना इकॉनॉमी सीट ऑफर केली आहे. तुमचे बाळ 0- 2 वर्षांचे असेल, तर त्याचे भाडे बुकिंग वेळी IRCTC कार्यालयात रोख स्वरूपात जमा करावे लागणार आहे.
टूरदरम्यान काय पाहाल ?
गोवा टूरमध्ये (IRCTC Goa Package) पर्यटकांना एकूण 5 दिवसांची संधी मिळणार आहे. पहिल्या दिवशी गोव्यापर्यंत प्रवास होणार असून तेथील हॉटेलमध्ये विश्रांती होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर उत्तर गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येतील. उत्तर गोव्यातील बागा, हणजुणे, आग्वाद या पर्यटन स्थळांना पर्यटक भेट देऊ शकतात. तिसऱ्या दिवशी दक्षिण गोवा परिसरात प्रवास केला जाणार आहे. यात ओल्ड गोवा चर्च, मिरामार बीच आणि दोना पावला येथे पर्यटक फिरू शकणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी मांडवी नदीवर रिव्हर क्रूझचा आनंद घेण्याची संधी पर्यटकांना मिळू शकेल. चौथ्या दिवशी दूधसागर धबधबा येथे पर्यटकांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. शेवटच्या 5 व्या दिवशी इतर काही पर्यटन स्थळांना भेटी देण्याची पर्यटकांना संधी मिळणार आहे. सायंकाळी पुन्हा हॉटेलमध्ये परतता येईल. 5 दिवसांसाठी 50 हजारांपेक्षा कमी खर्चात गोव्याची ट्रीप म्हणजे पर्यटकांना स्वस्तात गोव्याची मजा अनुभवण्याची अनोखी संधी आहे. या पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी IRCTC च्या संकेतस्थळावर जाऊन ‘न्यू इयर बोनान्झा इन गोवा’ (EGA013B) हे पॅकेज सर्च करा.