IRCTC : रेल्वेचे प्रवास हा सुखदायक प्रवास मानला जातो. शिवाय रेल्वेला इतर प्रवासी वाहनांपेक्षा कमी तिकीट आकारले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. खरेतर कोल्हापूर -पुणे या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी (IRCTC) मोठी सोय होणार आहे यात शंका नाही. चला जाणून घेऊया रेल्वेच्या या निर्णयाबद्दल अधिक माहिती …
ठराविक कालावधीपर्यंत धावणार रेल्वे गाड्या (IRCTC)
कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर अशा एकूण 184 फेऱ्या रेल्वेच्या माध्यमातून आता होणार आहेत. मात्र या फेऱ्या काही कायमस्वरूपी असणार नाही तर मध्य रेल्वे करून केवळ एक जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये (IRCTC) वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या आधी 56 फेऱ्यांसाठी मध्य रेल्वे कडून डिसेंबर महिन्यामध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता 184 फेऱ्यांची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर ते पुणे 92 आणि पुणे ते कोल्हापूर 92 फेऱ्यांचे नियोजन असेल.
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ही काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. आता हीच गाडी सहा नोव्हेंबर 2023 पासून कोल्हापूर ते पुण्यापर्यंत विशेष रेल्वे म्हणून धावते आहे. रात्री साडेअकरा वाजता गाडी कोल्हापूर (IRCTC) मधून सुटते आणि सात 45 वाजता पुण्यामध्ये पोहोचते. तर पुण्यातून रात्री नऊ चाळीस वाजता ही रेल्वे सुटते आणि कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी पहाटे पाच 40 वाजता पोहोचते. आता कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर फेऱ्यांची वाढ करण्यात आल्यामुळे हा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरहून शिक्षण,नोकरी आणि कामधंदा निमित्त येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
कुठे कराल बुकिंग ? (IRCTC)
विशेष रेल्वेसाठी विशेष प्रवास शुल्क द्यावा लागतो . तुम्हाला या रेल्वेने प्रवास करण्यासाठी या रेल्वे (IRCTC) गाडीचं आरक्षित तिकीट काढावे लागेल. http://www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर 30 जूनपासून तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.