IRCTC : कडून ‘भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर’ची घोषणा 14 दिवसांचा थरारक प्रवास!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC : पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आता एक नवीन आणि अद्वितीय आंतरराष्ट्रीय रेल्वे टूर घेऊन येत आहे. ‘भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर’. हा भव्य दौरा २८ जून २०२५ पासून सुरु होणार असून, भारतासोबतच शेजारील भूतान देशाची नयनरम्य ठिकाणेही या टूरमध्ये समाविष्ट असणार IRCTC आहेत.

१४ दिवस, १३ रात्रींचा अविस्मरणीय प्रवास

ही विशेष ट्रेन नवी दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून सुरू होणार असून, गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी मार्गे हसीमारा (प. बंगाल) या सीमावर्ती रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास होईल. येथून प्रवासी बसद्वारे भूतानमधील फुन्शोलिंग, थिंपू, पुनाखा आणि पारो (IRCTC) या ठिकाणी घेऊन जाण्यात येतील.

प्रवासातील वैशिष्ट्ये (IRCTC)

  • गुवाहाटीमध्ये प्रसिध्द कामाख्या देवीचं दर्शन, ब्रह्मपुत्रा नदीवर सूर्यास्त क्रूझ
  • शिलाँग – ‘पूर्वेचं स्कॉटलंड’ म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण, उमीयाम लेक व्यू पॉइंट
  • चेरापुंजी – सात बहिणी धबधबा, नोहकलीकाई आणि हत्ती धबधबा, मासमाई गुहा
  • भूतान – थिंपूतील मोतीथांग चिडीमार्ग, नॅशनल लायब्ररी, हस्तकला बाजार व ताशी चो डोंग
  • पुनाखा डोंग – दोन नद्यांच्या संगमावर वसलेली प्राचीन राजधानी
  • पारो – शेतशिवाराने सजलेली खोरे, पारो डोंग, लम्पेरी बॉटनिकल पार्क, लोखंडी पूल

टूरचे शुल्क व सुविधा: (IRCTC)

IRCTC ने या संपूर्ण टूरसाठी चार वेगवेगळ्या AC क्लासेस मध्ये शुल्क निश्चित केले आहे:

  • AC-1: ₹1,58,850 प्रति प्रवासी
  • AC-2 कॅबिन: ₹1,44,892
  • AC-2 टियर: ₹1,29,495
  • AC-3 टियर: ₹1,18,965

या सर्व शुल्कामध्ये रेल्वे प्रवास, ३-स्टार हॉटेलमध्ये निवास, शाकाहारी जेवण, बसमधून स्थानिक प्रवास, टूर गाईड, ट्रॅव्हल इन्शुरन्स यांचा समावेश आहे.

बुकिंगची अंतिम तारीख जवळ!

या १४ दिवसांच्या टूरमध्ये फक्त १५० प्रवाशांसाठीच जागा असून, IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर प्रथम येईल त्यास प्राधान्याने बुकिंगची संधी दिली जात आहे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षेचे व सुविधा व्यवस्थापनाचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

संपर्क व अधिक माहिती

बुकिंगसाठी पुढे दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या https://www.irctctourism.com आणि या टूरसाठी टूर कोड असेल भारत-भूतान मिस्टिक माउंटन टूर २०२५

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भूतानची शांतता, सौंदर्य आणि भारतातील नैसर्गिक वैभव अनुभवण्याची ही एकमेव आणि अनमोल संधी आहे. अशा अनुभवासाठी IRCTC च्या या टूरला एकदा तरी नक्की जाऊन यावं!