IRCTC : पाऊस बरसू लागला की वेध लागतात श्रावण महिन्याचे. हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. तेवढेच नाही तर या महिन्यात उपवास पकडले जातात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिव शन्करची आराधना केली जाते. या काळात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे सुद्धा पवित्र मानले जाते. म्हणूनच अनेक जण या काळात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. तुम्ही देखील असा काही प्लॅन केला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त माहिती घेऊन आलो आहोत. होय …! IRCTC कडून श्रावणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवण्यासाठी जबरदस्त टूर पॅकेजचे आयोजन केले आहे. चला जाणून घेऊया …
IRCTC ने पवित्र श्रावण महिन्यात श्रावण स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये 7 ज्योतिर्लिंगांचे एकाच वेळी दर्शन दिले जाणार आहे. यामध्ये भोजन आणि निवास सेवा मोफत असेल. हा प्रवास ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ‘सात ज्योतिर्लिंग यात्रा श्रावण स्पेशल’ असे या टूर पॅकेजचे नाव आहे. ही सहल 9 रात्री 10 दिसांची असेल . IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रवास विमाही मिळेल.
7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
- महाकालेश्वर
- ओंकारेश्वर
- त्रिमकेश्वर
- भीमेश्वर
- गृहेश्वर
- परि बाजीनाथ
- मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
किती आकारले जाईल भाडे ?
IRCTC चे हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला 20,900 रुपये खर्च करावे लागतील. तसे पाहायला गेल्यास पॅकेजनुसार किंमती बदलतात. जर तुम्ही स्लीपर कोच पॅकेज बुक केले तर तुम्हाला 20,900 रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही थर्ड एसी तिकीट बुक केल्यास 34,500 रुपये मोजावे लागतील. 2AC तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला 48,900 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे आगामी श्रावण महिन्यात या तूर पॅकेज सोबत 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला हरकत नाही.