ईशान्येकडील सुंदर स्थळांना भेट देण्यासाठी IRCTC चे अप्रतिम टूर पॅकेज !!! किती खर्च येईल ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ज्यामुळे IRCTC कडून देशभरातील विविध भागांमधील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठीचे टूर पॅकेजेस लाँच केले जात आहेत. आताही IRCTC ने आपल्या बजटनुसार पॅकेज आणले आहे. ज्याअंतर्गत ईशान्येकंदील सुंदर मैदानी भागामध्ये फिरण्याची संधी मिळेल. या पॅकेज अंतर्गत प्रवाशांना आसाम आणि मेघालयला भेट देण्याची देखील संधी मिळणार आहे. या पॅकेज अंतर्गत 8 दिवस आणि 7 रात्री मिळणार आहे. त्यामुळे जर आपण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आपल्याला या पॅकेजचा लाभ घेता येऊ शकेल.

North East Tour Packages | Book North East Tourism Packages | Go2Ladakh

हे जाणून घ्या कि, या पॅकेजद्वारे आपल्याला ईशान्येकडील भागाला भेट देता येईल. यामध्ये काझीरंगा, शिलाँग, चेरापुंजी, गुवाहाटी आणि मल्लिनॉन्ग या ठिकाणांचा इतिहास, संस्कृती आणि पूर्वेकडील निसर्गाची सुंदर दृश्ये पाहता येतील.

Hotspots of Kerala - 7 Nights / 8 Days Kerala Tour Package- Iris Holidays

किती खर्च येईल ???

या पॅकेजमध्ये एका व्यक्तीसाठी 63,600 रुपये मोजावे लागतील. तसेच दोन व्यक्तींसाठी 51,800 रुपये प्रति व्यक्ती भाडे असेल. तसेच तीन व्यक्तींसाठी फक्त 49,100 रुपये प्रति व्यक्ती द्यावे लागतील. त्याचप्रमाणे 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 41,700 रुपये आकारले जातील.

Explore North Eastern India on Special Tourist Train from IRCTC - Outlook  Traveller

कोणकोणत्या सुविधा मिळतील

या पॅकेज अंतर्गत हॉटेलमध्ये मुक्काम, विमानाचे तिकीट, खाण्यापिण्याच्या सुविधा मिळतील. यामध्ये IRCTC कडून नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. मात्र दुपारच्या जेवणासाठीची व्यवस्था आपल्या स्वतःलाच करावी लागेल.

50 per cent of SpiceJet flights grounded for 8 weeks following multiple  snags- The New Indian Express

प्रवासाविषयी जाणून घ्या

मुंबईपासून सुरु होणाऱ्या दोऱ्यातील पहिले डेस्टिनेशन गुवाहाटी असेल. स्पाइसजेटच्या विमानाने 5 मार्चला मुंबई विमानतळावरून हा प्रवास सुरू होईल आणि 12 मार्चला त्याच ठिकाणी संपेल. 8 दिवस चालणार्‍या या दौऱ्यात प्रवाशांना ईशान्येकडील भाग पाहता येणार आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctctourism.com/cheap-air-packages

हे पण वाचा :
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा