IRCTC : काशी विश्वनाथ आणि अयोध्येला भेट देण्याची सुवर्ण संधी, IRCTC चे खास बजेट पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC : देशभरात पावसाचा जोर थोडा ओसरत चालला आहे. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा पसरतो. शिवाय सर्वत्र सुंदर हिरवळ पसरते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC, कडून एक परवडणारे टूर पॅकेज सुरु करण्यात आले आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला IRCTC कडून निवास, भोजन, प्रवास, निवास, सर्व काही मिळेल. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तीर्थस्थानचे दर्शन घेऊ शकता. चला अधिक जाणून घेऊया या टूर बद्दल….

किती दिवसांची टूर ?

IRCTC कडून नियोजित करण्यात आलेली ही टूर 6 दिवस आणि 5 रात्रीची असेल.

पॅकेज बुक करण्यासाठी किती खर्च येईल?

या तुरीचे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला किमान 15,750 रुपये खर्च करावे लागतील. पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेगवेगळी पॅकेजेस निवडू शकता. याचा पर्याय IRCTC कडून देण्यात आला आहे.

टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये

  • पॅकेजचे नाव- कन्फर्म ट्रेन तिकिटासह राम मंदिर दर्शन (EHR133)
  • डेस्टिनेशन कव्हर्ड – वाराणसी आणि अयोध्या
  • किती दिवस चालेल -5 रात्री आणि 6 दिवस
  • कधी निघेल – दर शुक्रवारी
  • प्रवास मोड- ट्रेन

कसे कराल बुकिंग ?

IRCTC वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकता. बुकिंग आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील केले जाऊ शकते. पॅकेजशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही 8595904074/ 7003125135/ 6290861577/ 8100829002 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.