सरकारी नोकरीची संधी!! रेल्वेत थेट मुलाखतीद्वारे भरती; पात्रता काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) भरती जाहीर केली आहे. हॉस्पिटॅलिटी मॉनिटर या पदासाठी ही भरती होणार आहे. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न होता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023 रोजी होणार आहे.

संस्था – भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)
भरले जाणारे पद –  हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराचे B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) पर्यंत शिक्षण झाले असणे आवश्यक. तसेच 02 वर्षे अनुभव असावा.

पगार किती – 30,000/- रुपये दरमहा

या व्यतिरिक्त, ट्रेनमधील ड्युटीसाठी दररोजचा 350 रुपयांचा भत्ता तसेच रात्रीचा मुक्काम असल्यास बाहेरगावी निवासाचे शुल्क रु.240/- असेल. राष्ट्रीय सुट्ट्यांवर काम करण्यासाठी, हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स कर्मचाऱ्यांना 384/- प्रति NH. वैद्यकीय विमा- रु. 800/- p.m.

नोकरी करण्याचे ठिकाण – निवडलेल्या उमेदवारांना पूर्वोत्तर राज्ये/पश्चिम बंगाल/बिहार आणि झारखंड राज्यात नियुक्त केले जाऊ शकते. तथापि, IRCTC च्या नियमानुसार उमेदवाराची भारतात कुठेही बदली/पोस्टिंग केली जाऊ शकते.

वय मर्यादा – 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023
मुलाखतीचा पत्ता – खाली दिलेली PDF पहा.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.irctc.co.in/