IRCTC : आता तासंतास रांगेत उभे राहून रेल्वेचे तिकीट काढावे लागत नाही. रेल्वे स्टेशन वरील तिकीट खिडकी सोबतच आता ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा देखील रेल्वे कडून देण्यात येते. मात्र ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत असताना अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. अनेकदा साईट ला प्रॉब्लेम असतो किंवा मग तिकिटाचे पैसे लवकर रिफंड होण्याचे प्रवाशांना टेन्शन होते. मात्र आता ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना असुविधेचा सामना करावा लागणार नाही.
IRCTC नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करत आहे. नेक्स्ट जनरेशन प्लॅटफॉर्मची नवीन आवृत्ती पुढील वर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुक करताना कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय इतर सुविधांमध्ये देखील सुलभता येणार आहे चला तर मग जाणून घेऊया …
तिकीट बुकिंगचा वेग वाढणार
आय आर सी टी सी च्या वेबसाईटवर अनेकदा तिकीट बुकिंग करत असताना खूप वेळ लागतो. वेबसाईटवर जास्त लोड असल्यामुळे तात्काळ तिकीट मिळणं अवघड होऊन जातं म्हणूनच आय आर सी टी सी कडून तिकीट काढण्याची फॅसिलिटी अपग्रेड केली जात आहे. आय आर सी टी सी चे सीएमडी संजय कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार ई तिकिटिंग प्लॅटफॉर्मचे नवीन व्हर्जन पुढच्या (IRCTC) वर्षी मार्चपर्यंत सुरू होणार आहे. यामध्ये बुक केलेले तिकीट कॅन्सल केल्यानंतर लगेचच पैसे परत मिळणार आहेत.
केवळ दोन तासांत मिळणार रिफंड (IRCTC)
आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइटवर ऑटो पे नावाची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासांत प्रवाशांना पैसे परत मिळत आहेत. वास्तविक ही प्रणाली आयपीओप्रमाणे काम करत आहे. तिकीट बुक केल्याशिवाय बँक खात्यातून पैसे कापले जात नाहीत. ज्यांची तिकिटे रद्द झाली आहेत किंवा इतर कोणत्याही कारणाने तिकीट बुक होत नाही, त्यांचे पैसे दोन तासांत परत केले जात आहेत. 92 टक्के तिकिटांचे रिफंड दोन तासांत केले जात आहेत. IRCTC लवकरच 100 टक्के टार्गेट पूर्ण करेल. याचा फायदा असा होईल की वेटिंग तिकीट आल्यावर लोक तिकीट बुक करणार नाहीत. ऑटो पे सिस्टम सामान्य गेटवेप्रमाणेच काम करते. त्यामुळे बँक खात्यातून पैसे कापले जात नसून अवघे (IRCTC) दोन तास ब्लॉक केले जात आहेत.
वेटिंग तिकीट नको असेल तर पैसे कापले जाणार नाहीत (IRCTC)
आयआरसीटीसीने या समस्येवरही उपाय शोधला आहे, ज्यामध्ये जर कन्फर्म तिकिटांऐवजी वेटिंग तिकिटे मिळत असतील, तर पर्याय निवडणे तिकीट बुक करणाऱ्यांच्या हातात असेल. याचा फायदा असा होईल की तुमची इच्छा नसेल तर खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत. व्यवहार अयशस्वी झाल्यास, बँक खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत. मात्र पेमेंट कापले जाणार नाही परंतु ब्लॉक केले जाईल आणि काही काळानंतर ते बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.
तक्रार मिळाल्यानंतर IRCTC ॲक्शन मोडवर
प्रवाशांच्या तक्रारींवर आयआरसीटीसी सध्या कारवाई करताना दिसत आहे. IRCTC कडे 24 एप्रिल ते 24 ऑगस्ट दरम्यान 1000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जबाबदारी निश्चित करण्यासाठी, 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 20 प्रकरणांमध्ये एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वेतील अन्नाबाबत तक्रारी आल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत 150 हून अधिक बेस किचन सुरू करण्यात आले आहेत.