हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्यापैकी बऱ्याच जणांचा फिरणे हा सर्वात आवडता छंद असतो. यात कमी पैशांमध्ये जास्त ठिकाणी फिरता यावे असे सर्वांनाच वाटत असते. परंतु वाढत्या तिकिटांच्या दरांमुळे हे शक्य होत नाही. याच गोष्टीचा विचार करून भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी एक जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे. आयआरसीटीसीने (IRCTC Tour Package) आणलेल्या या पॅकेजमध्ये तुम्हाला सात ते आठ दिवस अनेक वेगवेगळ्या ठिकाणी फिरता येईल. यामध्ये वैष्णो देवी, कांगडा, धर्मशाला, कटरा आणि अमृतसर या ठिकाणांचा समावेश आहे.
IRCTC हे पॅकेज कसं आहे?
या पॅकेज ची माहिती आयआरसीटीसीच्या (IRCTC Tour Package) वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्यानुसार हे संपूर्ण पॅकेज 21,205 रुपयांचे आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला कमी पैशांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल. तसेच, वैष्णो देवी, कांगडा, धर्मशाला, कटरा आणि अमृतसर या सर्व ठिकाणांना भेट देता येईल.
खर्च किती येईल?
या पॅकेजअंतर्गत तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाही. या टूरमध्ये तुम्ही तिघेजण असाल आणि तुम्ही एकच रूम घेतली तर तुम्हाला फक्त 13 हजार 320 रुपये द्यावे लागतील. तर पाच ते अकरा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 8,850 रुपये मोजावे लागतील. या तुम्ही पिकनिक पुढचा विचार करत असाल आणि तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी 52,730 रुपये मोजावे लागतील. परंतु तुम्ही दोघेजण असाल तर 27,255 रुपये भरावे लागतील.
कोणत्या सुविधा मिळणार?
21,205 रुपयांचा या पॅकेजमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. जसे की सकाळ आणि संध्याकाळचे जेवण राहण्यासाठी रूम, नाष्टा, सुरक्षिततेची जबाबदारी अशा गोष्टींचा यात समावेश असेल. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या टूर पॅकेजचा (IRCTC Tour Package) नक्की विचार करा.