IRCTC : केवळ देशातच नाही तर परदेशात फिरायला जायची इच्छा अनेकांची असते. त्यातही युरोप म्हणजे स्वप्नातल्या ठिकाणासारखा सुंदर प्रदेश. तुम्हाला देखील युरोप टूर करायची असेल तर तुम्हाला आज आम्ही एका खास पॅकेज ची माहिती देणार आहोत. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) कडून अनेक टूर अरेंज केल्या जातात. IRCTC कडून युरोप टूर आयोजित केली आहे यात युरोप मधल्या 5 देशांची सफर करता येणार आहे.
आयआरसीटीसीचं हे पॅकेज 13 दिवस आणि 12 रात्रींचं आहे. हा प्रवास (IRCTC) 29 मे, 2024 पासून सुरु होईल. ज्यासाठी सध्या बुकिंगही सुरु झाली आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला स्वित्झर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियम आणि जर्मनीला भेट देण्याची संधी मिळेल.
काय आहे पॅकेज ? (IRCTC)
पॅकेजचं नाव – European Express Ex Lucknow (NLO19)
डेस्टिनेशन कव्हर – ज्यूरिख (स्वित्झर्लंड), ब्रसेल्स (बेल्जियम), फ्रँकफर्ट (जर्मनी), (IRCTC) ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) आणि पॅरिस (फ्रान्स)
टूरचा कालावधी – 13 दिवस/ 12 रात्री
टूरची डेट- 29 मे 2024
ट्रॅव्हल मोड- फ्लाइट
क्लास- कंफर्ट
मील प्लॅन- ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर
किती येईल खर्च? (IRCTC)
टूर पॅकेजचे दर प्रवाशाने निवडलेल्या ऑक्यूपेन्सीनुसार असतील. पॅकेजची सुरुवात 3,05,400 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. तुम्ही या पॅकेज अंतर्गत एकाच व्यक्तीसाठी बुकिंग करत असाल तर तुम्हाला 3,67,800 रुपये खर्च करावे लागू शकतात. तुम्ही 2 लोकांसाठी बुकिंग करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 3,06,100 रुपये खर्च करावे लागतील. 3 लोकांसाठी बुकिंग करताना, तुम्हाला प्रति व्यक्ती 3,05,400 रुपये खर्च करावे लागतील.