चार धाम यात्रेसाठी IRCTC कडून खास पॅकेज; इथे करा बुकिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर या नव्या वर्षात चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी खास टूर पॅकेज घेऊन येत आहे. आझादी का अमृत महोत्सव आणि ‘देखो अपना देश’ अंतर्गत IRCTC कडून ही यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, बरकोट, जानकी चट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी आणि सोनप्रयागला तुम्ही भेट देऊ शकता.

एकूण 11 रात्री 12 दिवसांच्या या टूरची सुरुवात मुंबईतुन होणार आहे. 14 मे/21/मे 28/जून 4/जून 11/जून 18/जून 25 या तारखांना ही टूर निघणार आहे. यामध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये राहणे, विमानाचे तिकीट, खाणेपिणे आदी अनेक सुविधा मिळणार IRCTC देणार आहेत.पॅकेजच्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, या ट्रिपमध्ये तुम्ही एकटेच प्रवास करणार असाल तर तुम्हाला 69,111 रुपये खर्च करावे लागतील. तर 2 लोक असतील तर प्रति व्यक्ती 52,111 रुपये भाडे आहे. तसेच जर 3 लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 51,111 रुपये मोजावे लागतील. या टूर पॅकेज अंतर्गत 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसह 45,111 रुपये आणि बेडशिवाय 37,511 रुपये खर्च पडेल.

असे करा बुकिंग

जर तुम्हाला चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या वेबसाइटला भेट द्या. आणि बुकिंग करा. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील चारधाम यात्रेसाठी बुकिंग केले जाऊ शकते.