IRCTC : भारतीय लोकांना पर्यटनाची विशेष आवडआहे. प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक खास ट्रिप आयोजित केली जाते. हे करीत असताना अनेकदा राहणे, खाणे, फिरणे यांचा अवास्तव खर्च होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका विशेष टूर (IRCTC) बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप प्लॅन करता येईल.
आज आम्ही ज्या ट्रिप बद्दल सांगत आहोत ते ठिकाण म्हणजे तिरुपती बालाजी… तिरुपती हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित सर्वात लोकप्रिय धार्मिक शहरांपैकी एक आहे. तिरुपतीला तिरुमला म्हणूनही ओळखले जाते. भगवान विष्णूच्या श्री वेंकटेश्वर मंदिरासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर तिरुमला टेकडीच्या (IRCTC) शिखरावर आहे, तर तिरुपती शहर पायथ्याशी वसलेले आहे.
काय आहे तिरुपती बालाजी टूर पॅकेज ?(IRCTC)
IRCTC ने तिरुपती बालाजीसाठी 4 रात्री आणि 3 दिवसांच्या सहलीचे नियोजन केले आहे, जे प्रवाशांना 29 मे रोजी मुंबईहून तिरुपती बालाजी आणि कालहस्तीला घेऊन जाईल, जिथे त्यांना कालहस्ती मंदिर आणि पद्मावती मंदिराचे दर्शन करता येईल.
‘या’ सुविधा मिळतील
मुंबईपासून सुरू होणाऱ्या या टूरमध्ये ट्रेनचे तिकीट, तिरुपतीमधील 1 रात्रीचे हॉटेलमध्ये राहणे, रात्रीचे जेवण, नाश्ता, AC वाहनातून दर्शन घेणे, बालाजी मंदिर दर्शन पास, स्थानिक टूर गाइड आणि प्रवास विमा (IRCTC) यांचाही समावेश आहे.
किती येईल खर्च
IRCTC नुसार, तिरुपती बालाजीच्या 3 दिवसांच्या सहलीसाठी प्रवाशाला 9,050 ते 12,100 रुपये मोजावे लागतील. दोघांसाठी 7,390 ते 10,400 रुपये आणि तिघांच्या प्रवासासाठी 7,290 ते 10,300 रुपये प्रवासी भाडे निश्चित करण्यात आले आहे. जर तुम्ही या सहलीवर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना घेऊन जात असाल तर तुम्हाला त्यांच्यासाठी 6,500 ते 9,500 रुपयांमध्ये बुकिंग करावे लागेल.
कुठे कराल बुकिंग ?
तुम्हीही तिरुपती बालाजीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा किंवा थेट लिंक https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WMR171 वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर मेल देखील करू शकता.