भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेली IRCTC वेळोवेळी प्रवाशांसाठी टूर पॅकेज आणत असते. दरम्यान, IRCTC ने देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे संयुक्त पॅकेज सुरू केले आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या टूर पॅकेजमध्ये पुरी, कोणार्क, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराजचा प्रवास भारत गौरव पर्यटक स्पेशल प्रवास ट्रेनमधून केला जाईल.
हे पॅकेज सिकंदराबादपासून सुरू होईल. IRCTC चे हे पॅकेज 9 रात्री 10 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी करण्याची गरज नाही. 11 डिसेंबरपासून हा प्रवास सुरू होणार आहे. या पॅकेजमधील एकूण जागांची संख्या 718 आहे.
या टूरची वैशिष्ट्ये
- पॅकेजचे नाव- अयोध्या-काशी: पुण्य क्षेत्र यात्रा
- टूर कोड- SCZBG33
- भेट देण्याची ठिकाणे – पुरी, कोणार्क, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज
- दौरा किती दिवस चालेल – 9 रात्री आणि 10 दिवस
- प्रस्थान तारीख- 11 डिसेंबर 2024
- जेवणाची योजना- सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
- प्रवास मोड- ट्रेन
ही ठिकाणे पहाण्याची संधी
- पुरी: भगवान जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर
- गया: विष्णुपद मंदिर
- वाराणसी: काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉर, काशी विशालाक्षी आणि अन्नपूर्णा देवी मंदिर, संध्याकाळची गंगा आरती
- अयोध्या: रामजन्मभूमी, हनुमानगढी आणि सरयू नदीवर आरती.
- प्रयागराज : त्रिवेणी संगम
कसे कराल बुकिंग ?
पॅकेज 16,800 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात.