IRCTC Tour Package | भारतामध्ये अनेक लोक हे प्रवास करण्यासाठी रेल्वेचा उपयोग करतात. कारण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत आरामदायी आणि परवडणारा देखील असतो. जर आता तुम्ही देखील दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय रेल्वे कंपनी IRCTC चे एक नवीन पॅकेज टूर घेऊन आलेले आहे. भारतीय रेल्वे कंपनीचे IRCTC चे पॅकेजचे प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कारण ते त्यांच्या प्रवाशांना खूप चांगल्या सुविधा देतात. भारत गौरव टुरिस्ट यांच्या दक्षिण भारत टूर पॅकेज अंतर्गत दक्षिण भारतातील मंदिरांना आता भेट देण्याची एक संधी चालून आलेली आहे. हे पॅकेज तुमच्यासाठी आठ रात्री आणि नऊ दिवसांसाठी असणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील अरुणाचलम, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि तंजावर या ठिकाणी नेले जाणार आहे.
याबाबतची माहिती IRCTC यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे. तुमचे हे पॅकेज टूर्स सिकंदराबाद येथून सुरू होणार आहे. हा संपूर्ण प्रवास तुमचा ट्रेनने होणार आहे. 22 जूनपर्यंत हा तुमचा प्रवास सुरू राहणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी करण्याची काही गरज नाही. कारण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. या स्पेशल ट्रेनमध्ये एकूण 716 सीट आहेत, त्यापैकी स्लीपर 460, थर्ड क्लास 226 सेकंड एसी 50 आहेत
किती खर्च येईल? | IRCTC Tour Package
प्रवाशाने निवडलेल्या श्रेणीनुसार टूर पॅकेजचे दर बदलतील. पॅकेज 14,250 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. जर तुम्ही इकॉनॉमी कॅटेगरीत बुक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 14,250 रुपये द्यावे लागतील. तर लहान मुलांसाठी अर्थव्यवस्थेत 13,250 रुपये दर ठेवण्यात आला आहे. मानक श्रेणीतील एका व्यक्तीसाठी भाडे 21,900 रुपये आणि मुलांसाठी 20,700 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आराम श्रेणीसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 28,750 रुपये द्यावे लागतील. या श्रेणीतील मुलांसाठी भाडे 27,010 रुपये ठेवण्यात आले आहे. IRCTC वेबसाइटला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
कुठे भेट देणार?
- तिरुवन्नमलाई: अरुणाचलम मंदिर
- रामेश्वरम: रामनाथस्वामी मंदिर
- मदुराई: मीनाक्षी अम्मन मंदिर
- कन्याकुमारी: रॉक मेमोरियल, कुमारी अम्मान मंदिर
- त्रिवेंद्रम: श्री पद्मनाभस्वामी मंदिर
- त्रिची: श्री रंगनाथस्वामी मंदिर
- तंजावर: बृहदेश्वर मंदिर