IRCTC Tour Package : तिरुपती पासून रामेश्वरमपर्यंत देव दर्शन घडवून आणतेय भारतीय रेल्वे; खर्च किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून सुट्टीच्या या दिवसात तुम्ही देवदर्शनचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी IRCTC आपल्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन येत आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे . या पॅकेजच्या माध्यमातून बंगळूर ,म्हैसूर ,कन्याकुमारी,तिरुअनंतनपूरम ,रामेश्वरम, मदुराई आणि तिरुपति इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देता येईल. IRCTC चे हे पॅकेज १० रात्री आणि ११ दिवसांसाठी आहे. या पॅकेजचा लाभ उठवण्यासाठी प्रवाश्यांना फक्त प्रवासाचे पेमेंट करावे लागेल बाकी जेवण,नाश्ता,राहण्याची सोया हि IRCTC कडून करण्यात येईल.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून या यात्रेची सुरवात होणार असून हि यात्रा भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Special Train) च्या माध्यमातून घडवून आणण्यात येईल. या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा , पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर आणि कलबुर्गी स्थानकांवर बोर्डिंग/डिबोर्डिंग करू शकतात . IRCTC कडून या पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी जेवण ,नाश्ता, इद्यादी सर्व सुविधा ऑन बोर्ड आणि ऑफ बोर्ड उपलब्ध करण्यात येणार आहे.

सदर टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये –

पॅकेजचे नाव -Bangalore Mysore Kanyakumari With Dakshin Bharat Gaurav Yatra (WZBG04)
बोर्डिंग/डिबोर्डिंग– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड कुर्डुवाडी, सोलापुर आणि कलबुर्गी
कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येईल – बेंगलुरु, मैसूर, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, रामेश्वरम, मदुराई आणि तिरुपति
प्रवासाचा एकूण कालावधी – १० रात्री आणि ११ दिवस
प्रवासाची तारीख– २३ मे २०२३

टूरसाठी येणारा एकूण खर्च-

IRCTC कडून या टूर पॅकेजसाठी वेगवेगळा दर आकारण्यात आला आहे. त्यानुसार, इकोनॉमी कॅटेगरीत (स्लीपर) कोचमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 17,490 /- रुपये प्रति व्यक्ती खर्च येईल, कम्फर्ट कॅटेगरीत (थर्ड एसी) प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 30,390 /- रुपये प्रति व्यक्ति खर्च येईल. तसेच डीलक्स कॅटेगरीत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला 36,090/- रुपये प्रतिव्यक्ती खर्च येईल.