IRCTC Tour Packages : स्वस्तात करा थायलंडची सफर; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, तुम्हाला जर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असेल तर चिंता करू नका. नेहमीप्रमाणे इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC Tour Packages) तुमच्यासाठी आकर्षक असं टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही विमानाने थायलंडचा प्रवास करू शकता. तसेच या प्रवासादरम्यान, तुमच्या खाण्या- पिण्याचा खर्च स्वतः IRCTC करणार आहे. IRCTC चे टूर पॅकेज कधीपासून आहे, यामध्ये कुठून व कस जायचं तसेच प्रवासासाठी नेमका किती खर्च येऊ शकतो हेच आज आपण अजनून घेऊयात.

किती रुपये खर्च? IRCTC Tour Packages

‘स्पार्कलिंग थायलंड एक्स लखनौ’ असे या पॅकेजचे नाव आहे.  तुम्हाला ह्या पॅकेजअंतर्गत थायलंडमध्ये 5 रात्री आणि 6 दिवस फिरण्याची संधी मिळेल. एवढंच नाही तर तुम्हाला बँकॉक आणि पटाया या सुंदर ठिकाणांना भेट देण्याची देखील संधी मिळेल. या संपूर्ण पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ६९,८०० रुपये खर्च करावे लागतील. जर दोघेजण असाल तर प्रतिव्यक्ती ६०,३०० रुपये आणि जर तुमच्यासोबत ५ ते ११ वर्ष वयाची मुले असतील तर त्यांच्यासाठी ५५,२०० रुपये खर्च पडेल.

IRCTC Tour Packages thailand 3

 

कसा असेल ह्या प्रवासाचा कालावधी?

IRCTC 8 डिसेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 पर्यंत थायलंडला भेट देण्यासाठी हवाई टूर पॅकेज चालवणार आहे. हे पॅकेज (IRCTC Tour Packages) लखनऊच्या नवाबांच्या शहरापासून सुरू होईल. प्रवासासाठी लखनऊ येथून बँकॉक आणि बँकॉक येथून लखनऊ अशी थेट फ्लाईट असेल. त्यामुळे तुमचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो. तसेच खाण, राहणं ह्यासारख्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील.

IRCTC Tour Packages thailand
IRCTC Tour Packages thailand

असे करा तिकीट बुक-

ह्या टूरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या मुख्य म्हणजेच ‘irctctourism.com’ वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता.