IRCTC Tour Packages For Tirupati : तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायचंय? IRCTC ने आणलं स्वस्तात टूर पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. वेंकटेश्वर स्वामी हे या मंदिराचे मुख्य देवता असून देशातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये बालाजी मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यात आहे. बालाजीपुढे व्यक्त केलेली कोणतीही इच्छा तो पूर्ण करतो असे मानले जाते त्यामुळे आयुष्यात एकदा तरी बालाजीचे दर्शन घ्यावे असं भक्तांना वाटत असते. सध्या उन्हाळा सुरु असून तुम्हीही सुट्ट्यांच्या या दिवसात तिरुपती बालाजीला जायचा विचार करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी एक खास टूर पॅकेज (IRCTC Tour Packages For Tirupati) आणलं आहे, त्यामाध्यमातून तुम्ही अगदी आरामात बालाजीचे दर्शन करू शकता.

IRCTC वेळोवेळी आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी काही टूर पॅकेज आणत असते. या टूर पॅकेजच्या मदतीने देशातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना सहज भेट देता येते . आता पुन्हा एकदा IRCTC ने धार्मिक टूर पॅकेज लाँच केले आहे. ज्याच्या मदतीने तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. IRCTC चे तिरुपती बालाजी टूर पॅकेज 20 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तुम्ही दर शनिवारी या पॅकेजसाठी (IRCTC Tour Packages For Tirupati) बुकिंग करू शकता. IRCTC चे तिरुपती बालाजी टूर पॅकेज हे एक रात्र आणि 2 दिवसांचे टूर पॅकेज आहे ज्यामध्ये प्रवास विमानाने केला जाईल.

या टूर पॅकेजची फी किती? IRCTC Tour Packages For Tirupati

IRCTC च्या तिरुपती बालाजी टूर पॅकेज अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 16600 रुपये भाडे द्यावे लागेल. जर दोन जणांनी प्रवास केल्यास प्रति व्यक्ती १४९०० रुपये मोजावे लागतील. जर तुमच्यासोबत लहान मूल प्रवास करत असेल तर त्यासाठी 12800 रुपये वेगळे द्यावे लागतील. या टूर पॅकेजमध्ये राउंड ट्रिप फ्लाइट तिकीट, हॉटेल खर्च, जेवण इत्यादींचा समावेश आहे. तुम्हाला IRCTC च्या तिरुपती बालाजी टूर पॅकेजचे बुकिंग करायचं असेल तर अधिकृत वेबसाईटवरून बुकिंग करू शकता.