IRCTC Tour Packages : हिवाळ्यात करा उत्तर भारताची सफर!! IRCTC ने आणलं खास पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. आणि या गुलाबी थंडीत परिवारासोबत, जोडीदारासोबत फिरण्याची मजाच काही और असते. त्यातल्या त्यात तुम्हाला जर एखादे मोठे टुरिस्ट पॅकेज भेटले तर ती सैर अविस्मरणीय राहते. अगदी तसेच पॅकेज IRCTC ने प्रवाश्यांसाठी (IRCTC Tour Packages) आणले आहे. IRCTC च्या या पॅकेज अंतर्गत तुम्ही उत्तर भारताची सफर करू शकता. ही सफर कधीपासून सुरु होणार आहे तसेच यासाठी किती रुपये खर्च आहे हे आज आपण जाणून घेऊयात.

16 नोव्हेंबरला होईल सुरुवात

IRCTC ची ही टूर 16 नोव्हेंबर (IRCTC Tour Packages) पासून सुरु होणार असून तब्बल 15 दिवस तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे प्रवाश्यांना आपल्याला आवडत्या ठिकाणी जाण्याचा हा एक उत्तम चान्स आहे. असे म्हणायला हरकत नाही. या टूर पॅके मध्ये उत्तर – पूर्व राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नागालँड, आसाम, मेघालय, त्रिपुरा ह्या राज्यांचा समावेश असणार आहे. तसेच त्यामध्ये असाम मध्ये गुवाहटी, शिवसागर, जोरहाट, कजीरंगा या ठिकाणाचा समावेश असणार आहे. नागालँडमध्ये दीमापुर आणि कोहिमा या दोन स्थळांना भेट दिली जाईल. त्रिपुरा मध्ये उनाकोटी, अगरतळा आणि उदयपुर पाहायला मिळेल तर मेघालय मध्ये शिलांग आणि चेरापूंजीचा समावेश आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे आलीगढ, गजियाबाद, टुंडला, कानपुर, आणि लखनऊ ह्या रेल्वे स्थानकावरून तुम्ही हा प्रवास करू शकता. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे येथील सौंदर्य हे हिवाळ्यात अधिक सुंदर दिसते. त्यामुळे प्रवाश्यांना एक स्मरणीय क्षण टिपता येईल.

204 प्रवाश्यांना मिळणार समावेश- IRCTC Tour Packages

16 नोव्हेंबर पासून सुरु होणारी ही टूर एकूण 14 रात्री आणि 15 दिवसाची असणार आहे. त्यामध्ये एक, दोन, तीन असे तीन डब्बे वाताणुकुलीत असणार आहेत. त्यामध्ये एकूण 204 प्रवासी बसू शकतात. एवढी त्याची क्षमता असणार आहे.

कशी असेल ही टूर

या प्रवासाची सुरुवात (IRCTC Tour Packages) ही गुवाहटी पासून सुरु होणार आहे. येथे काही मंदिराचे दर्शन घेऊन गाडी नाहरलागून रेल्वे स्टेशनसाठी रात्री रवाना होईल. यानंतर पुढे शिवसागरला ट्रेन जाईल. जिथे आसामचे सौंदर्य पाहायला मिळेल. तसेच जोरहाट आणि काजिरंगा ला रात्री गाडी थांबेल आणि सकाळी तेथील स्थित उद्यानाचा व जंगलाचा आनंद तुम्हाला लुटता येईल.  त्यानंतर त्रिपुरा हा शेवटचा टप्पा असून तेथील निसर्ग सौंदर्य आणि प्रार्थनास्थळांचा अनुभव घेता येणार आहे.