लग्नासाठी ट्रेनचा संपूर्ण डबा बुक करणे स्वस्त आहे की सीट्स ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपल्याकडे तुळशीची लग्न झाल्यावर लग्नाचा सिझन सुरु होतो. लांब पाल्याच्या ठिकाणांकरिता बस ने प्रवास करण्यापेक्षा रेल्वेने केलेला प्रवास हा सुखकर आणि बजेटफ्रेंड्ली सुद्धा असतो. तुमच्या सुद्धा घरात आगामी काळात कुणाचे लग्न असेल तर लांबच्या नातेवाईकांसाठी तुमही ट्रेनची बोगी बुक करू इच्छित असाल त्याचे नियोजन कसे करावे ? बोगी बुक करायची की सीटस बुकरायच्या ? कोणता पर्याय योग्य ठरेल हेच आजच्या लेखात जाणून घेऊया…

काय आहे स्वस्त ?

लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींसाठी ट्रेनचा संपूर्ण डबा किंवा कोचच्या जागा बुक करणे हा एक फायदेशीर सौदा आहे. दोन्ही बुकिंगमध्ये खूप फरक आहे, हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. भारतीय रेल्वेच्या मते, जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये सीट बुक करता तेव्हा रेल्वे तुमच्याकडून फक्त भाडे आकारते आणि इतर कोणतेही शुल्क आकारत नाही. परंतु जर तुम्ही संपूर्ण डबा किंवा ट्रेन बुक केली तर तुम्हाला विविध शुल्क द्यावे लागतील, जे खूप महाग आहेत. या संदर्भात रेल्वे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सीट बुक करण्याच्या तुलनेत संपूर्ण डबा बुक करण्यासाठी तुम्हाला जवळपास तिप्पट जास्त शुल्क द्यावे लागते. त्यामुळे स्वतंत्र जागा बुक करणे स्वस्त आहे.

सीट बुक करणे स्वस्त आहे पण ही आहे समस्या

कोचच्या तुलनेत सीट बुक करणे स्वस्त आहे पण एक समस्या अशी आहे की एका PNR मध्ये सहा पेक्षा जास्त तिकिटे बुक करता येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यामध्ये सर्व 72 जागांसाठी 12 लोक रांगेत उभे असले तरीही वेगवेगळ्या डब्यांमध्ये जागा मिळू शकतात. कारण तिकीट बुकिंग एकाच वेळी ऑफलाइन आणि ऑनलाइन सुरू असते

कोच बुक करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क

कोच किंवा संपूर्ण ट्रेनचे बुकिंग फुल टेरिफ रेट (FTR) वर केले जाते. यामध्ये प्रति डबा 50 हजार रुपये सुरक्षा जमा करावी लागणार आहे. प्रवासाच्या सुरुवातीपासून अंतिम गंतव्यस्थानापर्यंत भाडे भरावे लागेल. प्रवासासाठी 30 टक्के सेवा शुल्क देखील भरावे लागेल. प्रवास किमान 200 किमी असावा. कोच थांबवल्यास त्याचे शुल्क वेगळे भरावे लागेल. यासोबतच एसी आणि फर्स्ट कोचच्या बुकिंगसाठी पाच टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. सुपरफास्ट ट्रेनमध्ये बसवल्यास सुपरफास्ट चार्ज समाविष्ट केला जाईल. जर तुम्ही संपूर्ण ट्रेन बुक केली तर इंजिन स्टॉपिंग चार्जेस देखील भरावे लागतात. अशा प्रकारे ते बरेच महाग होते.