थंडीत स्वेटर घालून झोपणे आरोग्यासाठी योग्य आहे का??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या थंडीचे वातावरण सुरु आहे. काही ठिकाणी थंडीचे तापमान हे अधिक आहे. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर, मफलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अधिक थंडी जाणवू नये यासाठी स्वेटरचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये लोकर, जर्किंग यासारख्या पद्धतीचे स्वेटर घातले जाते. पंरंतु अनेकदा या स्वेटरमुळे आपल्या आरोग्यावर बोट उचलले जाते आणि प्रश्न पडतो तो स्वेटर हे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? याचबद्दल जाणुन घेऊयात.

लोकरमध्ये असते फायबर

थंडी ही अनेकांना सहन होत नाही. त्यामुळे अधिक ऊबदार असलेले लवकरचे स्वेटर घातले जाते. तसेच सॉक्स घातले जातात. रात्री झोपताना याचा वापर अधिक केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही वापरत असलेल्या लवकरच्या स्वेटर निर्मितीसाठी फायबर वापरले जाते. हे जाड असल्यामुळे शरीराची उष्णता बाहेर जात नाही आणि थंडी शरीराला जाणवत नाही. शरीरातील ही उष्णता बाहेर न पडल्यामुळे अनेकांना त्वचेचे प्रॉब्लेम निर्माण होतात. तर इतर शारीरिक समस्याही उद्भवल्या जातात. त्यामुळे तुम्ही जर लोकरच्या स्वेटर घालून झोपत असाल तर आताच सावध व्हा.

स्वेटरमुळे ब्लड प्रेशर वाढते

थंडी जाणवू नये यासाठी शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी ऊबदार कपडे तसेच स्वेटर रात्री झोपताना घातले जाते. यामुळे घाम येऊन तुमचे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर वाल्यांनी अधिक ऊबदार कपडे रात्री घालून झोपू नये असे केल्यास ते तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकते. तसेच हृदयाशी संबंधित समस्या असेल तर अश्या लोकांनी रात्री ऊबदार स्वेटर घालणे टाळावे.

शरीरावर येतात ओरखडे

हिवाळ्यात स्वेटर घातल्यानंतर ते जर अधिक गरम असेल तर शरीराला घाम येतो. परंतु थंडी अधिक असल्यामुळे ते जास्त जाणवत नाही. स्वेटर जर अधिक गरम असेल तर व्हेन्टीलेशन होणे शक्य नसते. परिणामी त्वचेचे प्रॉब्लेम होऊन शरीरावर ओरखडे तयार होऊ लागतात. काही जणांना तर अंगावर लाल चट्टे देखील येतात. त्यामुळे याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

सॉक्स देखील ठरतात घातक

अनेकदा आपल्याला असं सांगितलं जात की तळ पायाला थंडी अधिक जाणवते आणि त्यामुळे संपूर्ण शरीराला थंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण पायात लोकरचे सॉक्स वापरणे सुरु करतो. लोकरच्या कपड्यात थर्मल इन्सुलेशन चांगले असते परंतु ते घाम शोषू शकत नाहीत. यामुळे याचा परिणाम असा होतो की, पायाला इन्फेकशन होते आणि इतर आजाराला आमंत्रण दिले जाते. त्यामुळे जर तुम्ही लोकरचे सॉक्स रात्री झोपताना वापरत असाल तर त्याऐवजी तुम्ही पायात साधे सॉक्स घातले तर ते फायदेशीर ठरु शकते.