पंतप्रधान मोदी तुमचे वडिल आहेत का? : सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भाजपासोबत युती असताना निकालानंतर 2019 साली तुमच्याबाबत जनता तुम्हांला गद्दार म्हणूनच बोलत होती. शिंदे गटाला माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, मग पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील होते का? मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

सामनाला दिलेल्या मुलाखतीवर भाजपा नेत्यांनी तोंडसुख घेतले. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना संपवायची आहे, असाच आरोप ३५ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंबाबत कोल्हापूरच्या सभेत शिवसेना नेत्यांनी शरद पवारांबाबत केला होता. शिवसेना मोडायचा, संपवायचा डाव शरद पवारांचा आहे, असा होत होता. आता कोण -कोणावर आरोप करतो याची सत्यता जनतेला पडताळायची असते. आजची मुलाखत रश्मी ठाकरेंचा सामना, त्याचे संपादक आणि पक्षप्रमुख अशी आहे. त्यामुळे ही कौटुंबिक मुलाखत आहे. यात कुठलेही अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारण्यात येणार नाही हे अपेक्षित होते. ही मुलाखत जनतेची  सहानभुती मिळवण्याचा एक प्रयत्न आहे.

सूडाचं राजकारण नको म्हणता, मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीन पत्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असं म्हटल्यानंतरही 14 दिवस जेलमध्ये टाकलं. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून माजी सैनिकांचा डोळा फोडायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद भाष्य काँग्रेसनं करूनही गप्प बसायचं असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

मुंबईत पराभूत व्हावं लागेल

सध्याची मुलाखत चालू असली तरी मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना पराभूत व्हावेच लागेल. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला. भाजपाशी साथ सोडली, तेव्हा किती हजार कोटी खर्च झाले? जनतेच्या मनात खूप प्रश्न असल्याचेही भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.