हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या सर्वांनाच माहित आहे की रेल्वे आणि बसमध्ये लहान मुलांकडून कोणतेही तिकीट आकारले जात नाही. म्हणजेच लहान मुलांना रेल्वे आणि बसमधून मोबाईल प्रवास करता येतो. मात्र विमान प्रवास (Air Travel) करताना लहान मुलांचे पैसे भरावेच लागतात. त्यामुळे विमानाने प्रवास करायचा असल्यास लहान मुलांचे तिकीट बुक करताना सर्व बाबी तपासून घ्याव्यात. मुख्य म्हणजे, किती वर्षाच्या लहान मुलांसाठी विमानाचे तिकीट किती आहे? ते तिकीट कॅन्सल केल्यानंतर रिफंड किती मिळतो? हे माहीत असणे आवश्यक आहे.
तिकिटाचे दर काय?
विमानाने लहान मुलांच्या तिकिटाबाबत आणि त्यांच्या वयाबाबत काही नियमावली आणि अटी जारी केल्या आहेत.
त्यानुसार, विमानाचे तिकीट बुक करताना त्यामध्ये Children असा वेगळा विभाग दिला जातो. यामध्ये 2 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे भरावे लागतात. तर, तीन दिवस ते दोन वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी दहा टक्के दर आकारला जातो. या देशांतर्गत प्रवास करण्यासाठी 1500 रूपये घेतले जातात. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 2,350 रुपये घेण्यात येतात.
कोणत्याही विमानाने प्रवास करताना त्या बाळाचे वय सात दिवसांच्या वर असायला हवे. यापेक्षा खाली वय असलेल्या बाळांना विमानाने प्रवास करता येत नाही. मुख्य म्हणजे, नवजात बालकांना विमानाने प्रवास करण्यासाठी जन्माचा दाखला, हॉस्पिटलचे डिस्चार्ज पेपर, लस प्रमाणपत्र, पासपोर्ट अशी कागदपत्रे देखील जमा करावी लागतात.