ISRO ने घेतली आणखीन एक मोहिम हाती! ‘या’ ग्रहाचा करणार अभ्यास; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| चंद्रयान 3 च्या यशानंतर ISRO ने आता मंगळयान-2 ही अत्यंत महत्त्वाची मोहित हाती घेतली आहे. या मोहिमेच्याअंतर्गत ISRO NASA ला ज्यामध्ये यश मिळालेलं नाही, ती रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या 2024 मध्ये ISRO मंगळयान-2 मिशन लॉन्च करणार आहे. त्यामुळे ही मोहीत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी मोहीम ठरेल. परंतु त्यापूर्वी ISRO आदित्य एल-1 आणि मिशन गगनयान या दोन मोहिमांवर आपले लक्ष केंद्रित करेल. कारण की, गगनयान ही भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम आहे. ज्यामार्फत 3 क्रू सदस्यांना 400 km पृथ्वीच्या कक्षेत उतरवले जाईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्य एल-1 आणि मिशन गगनयान तसेच चंद्रयान 3 या मोहिमांच्या यशानंतर ISRO ने आता मंगळयान 2 मोहिमेचे काम हाती घेतले आहे. येत्या 2024 च्या अखेरपर्यंत ISRO मिशन मंगळयान लॉन्च करु शकते. हे एक मार्स ऑर्बिटर मिशन -2 असणार आहे. यापूर्वी 2014 साली भारताची पहिली मंगळ मोहीम यशस्वी ठरली होती. या मोहिमेच्या यशामुळे भारत मंगळावर जाणारा चौथा देश ठरला होता. त्यानंतर आता ISRO मंगळयान 2 मोहीम हाती घेतली आहे. ISRO ने मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी पुढच्या टप्प्यातील काम सुरू केले आहे.

मंगळयान 2 चे उद्दिष्ट

मार्स ऑर्बिटर मिशन -2 या मोहिमेच्या माध्यमातून ISRO मंगळाच्या ऑर्बिटमधून तिथले पर्यावरण आणि वातावरण याचा अभ्यास करेल. या मिशनच्या माध्यमातून मंगळावर चार पेलोड पाठवण्यात येतील. हे पेलोड मंगळावरील धुळीचा अभ्यास करतील. याला एनर्जेटिक आयन स्पेक्ट्रोमीटर असेल, यामार्फत चुंबकीय किंवा गुरुत्वाकर्षणाची माहिती जाणून घेता येईल. रेडियो ऑकल्टेशन तिसरा पेलोड मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करेल. आणि चौथा पेलोड मंगळावरील फोटो काढण्यास मदत करेल. या मोहिमेचे काम पूर्ण झाल्यानंतर तिला 2024 मध्ये लॉन्च करण्यात येईल.