संविधान बदलणं कुणाच्या बापालाही शक्य नाही.., फडणवीसांचे आंबेडकरांच्या ‘त्या’ आरोंपावर प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची संविधान सन्मान महासभा मुंबईत येथे पार पडली. या सभेमधून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर, “सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित आहे”, असा आरोप देखील लावला. त्यांच्या याचं आरोपाला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज माध्यमांशी बोलताना, “संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येत नाही, हे करणे कुणाच्या बापालाही शक्य नाही”, असे सडेतोड उत्तर फडणवीसांकडून देण्यात आले आहे.

आज आंबेडकरांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत फडणवीस म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की, भारताच्या संविधानाचा मूळ गाभा कोणालाच बदलता येत नाही. कुणालाच म्हणजे कुणालाच नाही. संविधानात अशी तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणार हा एक निवडणुकीतील जुमला आहे. कोणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही”

त्याचबरोबर, “निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात. अर्ध्या लोकांचं ‘संविधान बदलणार’ असं सुरू होतं. तर अर्ध्या लोकांचं ‘मुंबई तोडणार’ असं चालू होतं. आता हे वारंवार ऐकावं लागेल. पण मुंबई कोणी तोडू शकत नाही, संविधान कोणी बदलू शकत नाही. संविधानात जे बेसिक स्ट्रक्टर आहे ते कोणाचा बापही बदलू शकत नाही” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

दरम्यान, संविधान सन्मान महासभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, “वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या समर्थनार्थ ही चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस पक्षानेही येत्या कालावधीत दुसऱ्या राज्यात संविधानाची चर्चा सुरू करावी. सार्वजनिक सभा घ्याव्यात. काहीजण संविधान बदलू इच्छित आहेत. त्यांना माझं विचारणं आहे की, तुम्हाला संविधान का बदलायचं आहे?” त्यांच्या याचं आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.