IT क्षेत्रावर मंदीचे सावट? नोकऱ्या 1.5 लाखांनी कमी होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील चालू आर्थिक वर्षातील नोकऱ्याबाबत निराशाजनक परिस्थिती आहे. देशातील आघाडीच्या आयटी निर्यातदारांना या आर्थिक वर्षात नोकर भरतीमध्ये 40 टक्क्यांनी मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात सर्व IT सेवा दिग्गज 50,000 ते 1,00,000 कर्मचारी ऑनबोर्ड करतील असा अंदाज आहे. गेल्या वर्षी 2,50,000 नोकर भरती करण्यात आली होती. त्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. यामुळे तंत्रज्ञान सेवांमधील मंदी पुन्हा एकदा समोर आली आहे.

30 जून 2023 रोजी संपलेल्या या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, एचसीएलटेक, विप्रो आणि टेक महिंद्रा या भारतातील पाच आयटी निर्यातदारांची एकूण नेट हेडकाउंट 21,838 ने घसरला. हा ट्रेंड केवळ देशी दिग्गजांपर्यंत मर्यादित नाही. भारतात मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग असलेल्या इतर आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्येही प्रत्येकी 5,000 ची घट झाली.

टीमलीज डिजिटलचे मुख्य कार्यकारी सुनील सी म्हणाले, चालू आर्थिक वर्षात या क्षेत्राद्वारे निव्वळ नोकरभरतीत 40% घट होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. कारण कंपन्या प्रामुख्याने कर्मचारी वापर मेट्रिक्स वाढवण्यावर भर देत आहेत. मागील वर्षाच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा नवीन नियुक्तीची आवश्यकता सध्या तरी सुमारे 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.

Quess IT स्टाफिंगचे मुख्य कार्यकारी विजय शिवराम यांनी, IT सेवांमध्ये 25-30% ने कमी होत जाणार्‍या नोकरभरतीचे श्रेय, भारतीय IT उद्योगाच्या दोन सर्वात मोठ्या बाजारपेठा असलेल्या यूएस आणि युरोपमधील स्थूल आर्थिक प्रगतीला दिले. भू- राजकीय संघर्ष आणि तीव्र झालेल्या मॅक्रो आव्हानांमुळे या दोन्ही प्रदेशांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असं त्यांनी म्हंटल.

दरम्यान, विप्रोचे मुख्य HR अधिकारी (CHRO) सौरभ गोविल यांच्या मते, कंपनीने पहिल्या तीन महिन्यात एकही फ्रेशर्स ऑनबोर्ड केला नाही. आज आमच्याकडे क्षमता आहे. तर दुसरीकडे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले, “हायरिंगचे वातावरण कसे आहे आणि उर्वरित वर्ष कसे चालते यावर आधारित आम्ही नोकरभरतीच्या टार्गेट बाबत पाहू.