बुलढाणा हादरलं! नराधम शिक्षकांनेच आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर केला बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाण्यामध्ये एका शिक्षकानेच आठवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीला वासनेचे शिकार बनवल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या विद्यार्थिनीला धमकी देत शिक्षकाने वारंवार तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहर हादरून गेले आहे. तसेच, याप्रकरणी विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या नाराधम शिक्षकाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक काळापासून जिल्हा परिषद शाळेत शिकवणारा नराधम शिक्षक पीडित विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत होता. पीडित विद्यार्थिनी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. या विद्यार्थिनीचे काही खाजगी फोटो शिक्षकांच्या हाती लागले होते. याचाच फायदा घेत त्याने वारंवार पीडित विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तर, मला नकार दिल्यानंतर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यामुळे पीडित विद्यार्थिनीला शिक्षकाविरोधात जाऊन कोणतेही पाऊल उचलता आले नाही.

अखेर, या सर्व गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी आता आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत सांगितले की, आरोपी शिक्षकांकडे तिचे काही खाजगी फोटो होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी शिक्षकाने तिला दिली होती. याचा फायदा घेत शिक्षकाने तीचे लैंगिक शोषण केले. तसेच, कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिली. याच तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शिक्षकाविरोधात कारवाई केली आहे.