ITBP Recruitment 2024 | ITBP मध्ये 819 रिक्त पदांची भरती सुरु; महिना मिळणार 69 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ITBP Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील एक अशी संधी घेऊन आलेलो आहोत. आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. कारण आता भारत सरकारच्या गृह विभागाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला इंडो तिबेटियन पोलीस फोर्समध्ये (ITBP Recruitment 2024) नोकरी करण्याची संधी आहे. या पदाच्या तब्बल 819 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पुरुष आणि महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव | ITBP Recruitment 2024

आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल किचन सर्विस या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

रिक्त पदांची संख्या

आयटीबीपीमध्ये तब्बल 819 रिक्त जागा आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 458 जागा, एससी प्रवर्गासाठी 48, जागा एसटी प्रवर्गासाठी 70 जागा, ओबीसीसाठी 162 जागा तर ईडब्ल्यूएससाठी 81 जागा राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | ITBP Recruitment 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी आहे. तर महिला, माजी सैनिक, एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना फी भरावी लागणार नाही

मासिक पगार

कॉन्स्टेबल किचन सर्विसेस या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये एवढा पगार दिला जाईल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज प्रक्रिया

या भरती अंतर्गत पीईटी, पीएसटी आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

या भरतीचे अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | ITBP Recruitment 2024

1 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.