itel A50 आणि A50C मोबाईल लाँच; किंमत 5599 रुपये

itel A50 and A50C mobile
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्वस्त मोबाईल साठी ओळखल्या जाणाऱ्या itel कंपनीने भारतीय बाजारात A50 सिरीज अंतर्गत आणखी २ कमी पैशातील स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. itel A50 आणि A50C असं या दोन्ही मोबाईलची किंमत असून त्याची सुरुवातीची किंमत अवघी 5599 रुपये आहे. किंमत कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया….

itel A50 चे फीचर्स –

itel A50 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट 6.6-इंचाचा HD+IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनचा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये 3GB आणि 4 GB रॅमचा पर्याय मिळत असून 64GB स्टोरेज आहे. itel A50 मध्ये कंपनीने Unisock चा T603 प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 Go एडिशनवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 8MP AI कॅमेरा देण्यात आला असून सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी itel A50 मध्ये 5 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी टाइप-सी चार्जिंग पोर्टच्या मदतीने तुम्ही चार्ज करू शकता. हा स्मार्टफोन काळा, निळा, सोनेरी आणि हिरव्या रंगात लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 6,499 रुपयांपासून सुरू होते.

itel A50C चे फीचर्स-

itel A50C मध्ये 720 x 1612 पिक्सल रिझोल्युशनसह 6.6-इंचाचा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये Unisoc T603 प्रोसेसरबसवण्यात आला असून हा स्मार्टफोन सुद्धा ते Android 14 Go एडिशनवर काम करतो. itel च्या मोबाईल मध्ये 2 जीबी रॅम आणि 32जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, itel A50C मध्ये 8 MP चा ड्युअल रियर कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी itel A50C मध्ये 4 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. itel A50C मोबाईल ब्लॅक, ब्लू, गोल्डन आणि ग्रीन कलरमध्ये लाँच कऱण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत 5599 रुपयांपासून सुरू होते.