हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २-३ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझलच्या खर्चातून सुटका करण्यासाठी ग्राहकवर्ग इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती देत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने खास करून तरुणाईला या गाड्यांची चांगलीच भुरळ पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने भारतीय बाजारात Jeet X ZE स्कुटर नव्या व्हेरिएन्टमध्ये लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 100 किमी पेक्षा जास्त अंतर पार करेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेऊयात…..
63 किमी टॉप स्पीड–
कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kwh बॅटरी पॅक बसवला आहे. हि बॅटरी अंडरबोन फ्रेमपासून बनवण्यात आली असून तिच्यावर 5 वर्षांची वॉरंटी दिली आहे. हि बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केली तर मग हि इलेक्ट्रिक स्कुटर 100 किलोमीटर पर्यंत रेंज देते. iVOOMi च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको मोड, रायडर मोड आणि स्पीड मोड असे ३ मोड देण्यात आलेत. यामधील इको मोडमध्ये जास्तीत जास्त वेग रेंज 170 किमी आहे. तर राइड मोडमध्ये रेंज 140 किमी आणि स्पीड मोडमध्ये 130 किमी आहे. गाडीच्या टॉप स्पीड बाबत सांगायचं झाल्यास, 63 किमी/ प्रतितास इतके टॉप स्पीड या इलेक्ट्रिक स्कुटरच्या माध्य्मातून मिळतं. अन्य फिचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये स्मार्ट स्पीडोमीटर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन, ट्रिप डेटा, एसओसी अलर्ट यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत.
किंमत किती?
या नव्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Jeet X ZE च्या नव्या व्हेरिएन्टची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपासून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत या स्कुटरची डिलिव्हरी सुरू होईल. फेस्टिव्ह सीझनच्या सुरुवातीला डिलिव्हरी होत असल्याने कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो.