iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (iVOOMi JeetX Electric Scooter) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVOOMi Energy ने आज JeetX नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. ही स्कुटर RTO नोंदणीकृत असून ARAI ने प्रमाणित केली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

2 प्रकार मिळतील-

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित, असलेल्या या (iVOOMi JeetX Electric Scooter) स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर JeetX आणि JeetX180 या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

iVOOMi JeetX Electric Scooter

200KM मायलेज- (iVOOMi JeetX Electric Scooter)

iVOOMi JeetX इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी आणि रायडर मोडमध्ये सुमारे 90 किमीची मायलेज देऊ शकते. तर JeetX180 इको मोडमध्ये 200 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये सुमारे 180 किमीचे ऍव्हरेज देईल.

iVOOMi JeetX Electric Scooter

ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी-

या इलेक्ट्रिक (iVOOMi JeetX Electric Scooter) स्कुटरला ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्कूटरच्या इतर फीचर्सवर नजर टाकली, तर यामध्ये डिस्क ब्रेकसह सीबीएस सिस्टम देखील आहे. या स्कूटरमध्ये फूट रेस्ट देखील स्वतंत्रपणे वापरता येईल. iVOOMi एनर्जीच्या JeetX स्कूटरची बॅटरी 3 वर्षांच्या वॉरंटीसह येते. ही नवीन JeetX ई-स्कूटर चार मॅट रंग पर्यायांमध्ये येते. यामध्ये स्कार्लेट रेड, इंक ब्लू, पॉश व्हाइट आणि स्पेस ग्रे या रंगांचा समावेश आहे.

iVOOMi JeetX Electric Scooter

कोणाला देईल टक्कर-

iVOOMi ची ई-स्कूटर JeetX भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक (iVOOMi JeetX Electric Scooter) स्कूटर सेगमेंटमध्ये Ola S1 Pro, Bajaj Chetak आणि TVS iQube इलेक्ट्रिकला टक्कर देईल. JeetX ची बुकिंग आणि विक्री 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि JeetX180 साठी मात्र सप्टेंबर अखेरची वाट पाहावी लागेल. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर 3,000 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीजही मोफत दिल्या जात आहेत.