हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलच्या खर्चापासून स्वतःची सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. मागील वर्षभरात भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री चांगलीच वाढली असून अनेक कंपन्या नवनवीन गाड्या बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी iVooMe Energy ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. iVOOMi JeetX ZE असे या गाडीचे नाव असून सिंगल चार्जवर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 170 KM रेंज देतेय. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
iVOOMi JeetX ZE या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लुक आणि डिझाइन बद्दल सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कुटरची लांबी 760 मिमी, उंची 770 मिमी आणि व्हीलबेस 1350 मिमी आहे. सीटची उंची मतही आणि लांबलचक असल्याने लांबच्या प्रवासावेळीही रायडरला चांगला फील येईल. गाडीमध्ये मोठी बूट स्पेस देण्यात आली असून यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू ठेऊ शकता. या स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट, जिओ फेन्सिंग यासह इतर अनेक फीचर्स देण्यात आलेत.
170 KM रेंज- iVOOMi JeetX ZE
iVoom JitX GE इलेक्ट्रिक स्कूटर थर्ड जेनरेशन बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 2.1 किलोवॅट ते 3 किलोवॅटपर्यंत बॅटरीचे ऑप्शन आहेत. या बॅटरी रिमूव्हबल असून तुम्ही कधीही काढू शकता आणि परत बसवू शकता. एकदा हि बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 170 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे.
किंमत किती-
आता राहिला प्रश्न तो म्हणजे गाडीच्या किमतीचा, तर iVoom Jitx GE इलेक्ट्रिक स्कूटर 3 व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये 2.1kWh, 2.5kWh आणि 3kWh बॅटरी पॅक असे ३ वेगवेगळे प्रकार आहेत. या इलेक्ट्रिक स्कुटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 79,999 रुपये आहे. येत्या 10 मे पासून या गाडीचे बुकिंग सुरु होणार असून तुम्ही राखाडी, लाल, हिरवा, गुलाब, सोनेरी, निळा, चांदी आणि तपकिरी अशा 8 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.