iVOOMi S1 Lite Launched : फक्त 54,999 रुपयांत लाँच झाली Electric Scooter; 75 KM रेंज अन बरंच काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझलच्या खर्चातून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत असतात. दिसायला सुद्धा या गाड्या आकर्षक असल्याने तरुणाईची पसंती सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना आहे. मात्र किमती जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कारण पुण्यातील iVooMe एनर्जी कंपनीने स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लाँच (iVOOMi S1 Lite Launched) केली आहे. iVOOMi S1 Lite असं या इलेक्ट्रिक स्कुटरच नाव असून तुम्ही अवघ्या 54,999 रुपयांत खरेदी करू शकता.

75 किलोमीटर पर्यंत रेंज- iVOOMi S1 Lite Launched

iVOOMi S1 Lite या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये दोन बॅटरी पॅक बसवण्यात आले आहेत. यात एक आहे ती म्हणजे ग्राफीन आयन बॅटरी आणि दुसरी आहे ती लिथियम आयन बॅटरी पॅक.. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राफीन आयन बॅटरी पॅकच्या माध्यमातून 45 किमी प्रतितास इतकं टॉप स्पीड मिळते तर लिथियम आयन बॅटरी पॅक अंतर्गत 55 किमी प्रतितास इतकं टॉप स्पीड मिळते. ग्राफीन आयन बॅटरी 75 किलोमीटर पर्यंत रेंज देते तर थियम आयन बॅटरी पॅकच्या माध्यमातून ग्राहक 85 किलोमीटरपर्यंत अंतर सहज पार करू शकतात.

फीचर्स-

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, iVOOMi S1 Lite मध्ये 170 मिमी इतका ग्राउंड क्लीयरन्स आहे. यात अंदाजे 18 लीटरची बूट स्पेस, 10 आणि 12 इंच टायर्सचे पर्याय एलईडी डिस्प्ले स्पीडोमीटर, लाइटवेट चार्जर, वॉटर रेझिस्टन्स IP67 बॅटरी आहे. याशिवाय S1 Lite मध्ये मोबाईल चार्जिंगसाठी USB पोर्ट आणि LED डिस्प्लेसह स्पीडोमीटर आहे. iVoomi चे सह-संस्थापक आणि CEO अश्विन भंडारी म्हणतात की, आमची कंपनी ग्राहकांना परवडणारी आणि चांगली उत्पादने देण्यासाठी कटिबद्ध (iVOOMi S1 Lite Launched) आहे आणि S1 Lite त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.

किंमत किती?

या इलेक्ट्रिक स्कुटरच्या ग्राफीन आयन बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे तर लिथियम आयन बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. या स्कुटरचे बुकिंग सुरु झालं असून पर्ल व्हाइट, मून ग्रे, स्कार्लेट रेड, मिडनाईट ब्लू, ट्रू रेड आणि पीकॉक ब्लू सारख्या 6 आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहक ही इलेक्ट्रिक स्कुटर लाँच कऱण्यात आली आहे.