Tuesday, January 7, 2025

Jacob And Co New Watch : इंजिनिअरिंगचा चमत्कारिक आविष्कार; सेल, चार्जिंग नव्हे तर ‘या’ गोष्टीवर फिरतात घड्याळाचे काटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jacob And Co New Watch) अनेक लोकांना स्टायलिश घड्याळ वापरायला फार आवडतात. अगदी आपल्या जवळील अनेकांना घड्याळाचा प्रचंड नाद असल्याचे आपण पाहिले असेल. डिजिटल, गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम, डायमंड वॉच ते डिजिटल वॉच असे बरेच प्रकार आजकाल घड्याळात आढळून येतात. त्यामुळे माणसाच्या आधुनिकतेचं करावं तेवढं कौतुक कमीच!!

अशातच आता इंजीनियरिंगचा चमत्कार म्हटलं तर वावगं वाटणार नाही अशा एका घड्याळाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. होय. याला चमत्कार म्हणता येईल. कारण हे घड्याळ कोणत्याही सेल किंवा चार्जिंग डिवाइस वर चालत नाही. मग हे घड्याळ कशावर चालतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला लगेच या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

इंजिनिअरिंगचा चमत्कारिक आविष्कार

आपण ज्या घड्याळाबद्दल बोलतोय त्या घड्याळाची निर्मिती जेकब अँड कंपनीने केली आहे. हा एक लक्झरी ब्रँड असून ही कंपनी केवळ श्रीमंत आणि सेलिब्रिटी लोकांसाठी वस्तू तयार करते. (Jacob And Co New Watch) त्यांच्या वस्तू प्रचंड महाग असतात. इतक्या की नुसत्या कानावर पडल्या तरी घाम फुटतो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अशा किमतीच्या वस्तू खरेदी करण्याचा कधी विचार करत नाही. पण श्रीमंत लोकांची श्रीमंती यावर वाहून जात असते.

सांगायचा मुद्दा असा की, या कंपनीने तयार केलेलं हे घड्याळसुद्धा इतकंचं महाग आहे. (Jacob And Co New Watch) या घड्याळाची किंमत ३ लाख ८० हजार युएस डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ३ कोटी १४ लाख रुपये इतकी आहे. आता या घड्याळाची किंमत इतकी जास्त का आहे हे जाणून घेण्यासाठी आधी या घड्याळ्यात नेमकं काय खास आहे? हे जाणून घेऊ.

घड्याळाची खासियत (Jacob And Co New Watch)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घड्याळ कोणत्याही सेल, बॅटरी किंवा चार्जिंग डिवाइसवर चालत नाही. हे घड्याळ चालतं खनिज तेलावर. होय. हे घड्याळ खनिज तेलावर चालतं आणि यासाठी घड्याळामध्ये एक छोटासा पिंप तयार करण्यात आला आहे. यातील तेल तागडीसारख्या दिसणाऱ्या गॅझेटने काढलं जातं. ही तागडी फिरती ठेवण्यासाठी एक बटन दिलं आहे. ते दाबलं की या प्रोसेससह घड्याळाचे काटेसुद्धा फिरू लागतात.

माहितीनुसार, हे घड्याळ तयार करण्यासाठी जवळपास 18K व्हाईट गोल्ड वापरण्यात आले आहे. तसेच या घड्याळाचा पट्टा मगरीच्या चामडीपासून तयार करण्यात आला आहे. (Jacob And Co New Watch) भले या घड्याळात स्मार्टवॉच सारखे फीचर्स नसतील पण हे घड्याळ वेगळं आणि आकर्षक आहे यात काहीच शंका नाही.