काहीही!! एका जोडप्याने टॉयलेटमध्ये केलं लग्न; नवरीने स्वतःच निवडलेलं विवाहस्थळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आजकाल प्रत्येकाला आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं, हटके आणि चर्चेत राहील असं करायचं असतं. त्यामुळे मोठमोठे ग्राउंड, मॅरेज हॉल, बँक्वेट हॉल्स, लॉन्स अशा वेगवेगळ्या ठिकाणांचा विचार केला जातो. एकदम ग्रँड पद्धतीने लग्न करण्यासाठी मोठा तामझाम केला जातो. पण तुम्ही कधी टॉयलेट वेडिंग बद्दल ऐकलं आहे? नाही ना पण एका जोडप्याने हे करून दाखवले आहे. जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

एक लग्न असंही ..

एका वृत्तानुसार, लोगेन एबनी आणि टियाना एलीस्टॉक या जोडप्याने इतरांपेक्षा हटके लग्न करण्याच्या नादात टॉयलेटमध्ये लग्न केलं आहे. एका वृत्तानुसार या जोडप्याने म्हटलंय की, ‘आम्ही केंटूकीमध्ये पुरुषांच्या शौचालयात लग्न केले आहे’. मुख्य म्हणजे या जोडप्यातील नवरी एलीस्टॉक याच ठिकाणी काम करते असेही सांगण्यात आले आहे.

.. म्हणून केलं टॉयलेटमध्ये लग्न

या वृत्तात असेही म्हटले आहे की, नवरी मुलगी काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने लग्न करू इच्छित होती. तिला सामान्य लोकांसारखं सामान्य लग्न करायचं नव्हतं. तिला मनोरंजक पद्धतीने काहीतरी करायचं होतं. जे तिला मुलांना सांगता येईल आणि काहीतरी मजेशीर, चांगला अनुभव शेअर करता येईल. खूप विचार केल्यानंतर एलीस्टॉकने शौचालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तिने आपल्या बॉसला सांगितले. एलीस्टॉक काम करत असलेले एचओपी शॉप हे त्यांच्या अनोख्या बाथरूमसाठी आधीपासून ओळखले जाते. येथे बटन दाबल्यानंतर रंगबेरंगी लाईट डिस्प्ले होतात. त्यामुळे या बाथरूमला अनेक लोक डिस्को बाथरूम म्हणून देखील ओळखतात.

ब्राईड एलीस्टॉकचा निर्णय

अशा अनोख्या पद्धतीने लग्न करणारी नवरी एलीस्टॉक म्हणाली की, आम्ही एका डिस्को बाथरूममध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट खरंतर विनोदी पद्धतीने बोलली गेली होती. मात्र, जेव्हा मी बॉस सोबत बोलले त्यानंतर मी विचार केला की आपण असे का नाही करू शकत? आणि काही वेळानंतर मला हे सगळं शक्य वाटू लागलं. त्यानुसार लग्नासाठी हा अत्यंत वेगळा व्हेन्यू ठरला. याबाबत एचपी शॉप ने माध्यमांना देखील बातमी दिली होती. सगळं जादुई वाटत होतं. या लग्नासाठी डिस्को बॉलची देखील सजावट करण्यात आली होती’.

वृत्तानुसार, एलीस्टॉकने तिच्या नवऱ्यासोबत वेडिंग व्हेन्यू असलेल्या टॉयलेटमध्ये एंट्री करताच लाईट डिस्प्ले होऊ लागल्या. तसेच दोघांनी एकमेकांना वचन देत लग्न केलं. या लग्नासाठी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. याविषयी बोलताना एलीस्टॉकने सांगितले की, ‘लग्नानंतर आमचे आयुष्य फार छान सुरु आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही एकमेकांसाठी बनलेलो आहोत. हा संपूर्ण लग्नाचा क्षण आमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि आनंददायी ठरला’.