Jaipur Mumbai Train Shooting : धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jaipur Mumbai Train Shooting । जयपूर- मुंबई या पॅसेंजर रेल्वेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर येथे हा गोळीबार झाला. ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. त्यावेळी आरपीएफच्या कॉन्स्टेबल असलेल्या चेतन यानेच हा गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर जीआरपी मुंबईच्या जवानांनी आरोपी कॉन्स्टेबलला मीरा रोड बोरिवली येथे अटक केली.

पहाटे 5.23 वाजता घडली घटना – Jaipur Mumbai Train Shooting)

समोर आलेल्या माहितीनुसार, जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक १२९५६) कोच क्रमांक बी ५ मध्ये पहाटे 5.23 वाजता ही धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी घटना घडली. जयपूरहून ही ट्रेन मुंबईच्या दिशेने येत होती. यावेळी आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. याचवेळी झालेल्या भांडणातून चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज ASI टिका राम यांच्यावर गोळीबार केला. दुर्दैवी म्हणजे या गोळीबारात ट्रेनमधील ३ प्रवाशांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला.

या घटनेनंतर ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून चारही मृत्यू व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. याठिकाणी या मृतदेहांचे शवविच्छेदन पार पडेल . मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलिसांकडून सुरु झाला आहे. सध्या आरोपी चेतनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. परंतु या गोळीबार प्रकरणामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नोकरदार वर्गाला यामुळे ऑफिस वर जाण्यासाठी वेळेचा फटका बसू शकतो.