Tuesday, October 4, 2022

Buy now

जळगाव हादरलं! चोपड्यात प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका मुलाची गोळी मारुन तर मुलीची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हि हत्या (Murder) करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. राकेश संजय राजपूत असे गोळी घालून हत्या (Murder) कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असे मुलीचे नाव आहे. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे तर बाकी दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

सख्खा भाऊच मारेकरी
मृत राकेश आणि वर्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते पळून जाणार होते. याची माहिती वर्षाच्या भावाला कळल्यानंतर त्याने दोघांची हत्या (Murder) केली. वर्षा हिच्या अल्पवयीन भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर बहिणीची गळा दाबून हत्या केली. वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन चोपडा ते वराडे मार्गावर असलेल्या नाल्याजवळ आणले त्यानंतर दोघांची हत्या (Murder) करण्यात आली.

पिस्तुलासह पोलिसांसमोर सरेंडर
बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या (Murder) केल्यानंतर सख्खा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. यानंतर त्याने आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता त्यांना दोन मृतदेह आढळून आले. त्यात मुलाला गोळी झाडण्यात आली तर मुलीचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आला. चोडपा शहर पोलीस या दुहेरी हत्याकांडचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर