गिरीश महाजन हे संकटमोचक नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट…गिरीश महाजनांना (Girish Mahajan) दोन नंबरच्या पैशाची मस्ती…हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत…ही सगळी स्टेटमेंट आहेत. जळगावचे भाजपकडून स्टॅंडिंग खासदार मात्र सध्या ठाकरे गटात असलेल्या उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांची… ज्या गिरीश महाजनांना भाजप पक्षात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. तेच पाटील सध्या जळगावात भाजपसाठी संकट बनलेत, असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीसांचे अत्यंत विश्वासू, मनोज जरांगेंचं आंदोलन असून द्या किंवा मोहिते पाटलांची नाराजी भाजपकडून पहिली बोलणी करायला जातात ते गिरीश महाजन… भाजपसाठी संकट बनवून उभ्या राहिलेल्या अनेक परिस्थितीत महाजनांनी वाट मोकळी करून दिली. 2019 मध्ये पक्षात मेगा भरती केली… एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर याच महाजनांनी जळगावच्या राजकारणाचा होल्ड आपल्या हातात घेतला… राज्यातील भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या उमेदवारांसाठी हेच गिरीश महाजन सध्या जीव तोडून काम करतायत… सभा घेतायत… पण हेच महाजन ज्या जळगावातून येतात त्याच मतदारसंघात आलेल्या मशालीच्या संकटापुढे हे संकटमोचक सध्या हतबल झालेले दिसतायत. भाजपसाठी अतिशय सेफ गड समजल्या जाणाऱ्या जळगावला ठाकरेंचं वारं कस लागलं? पक्षाला राज्यात येणाऱ्या अडीअडचणी सोडवणाऱ्या महाजनांना जिथून राजकारणाची बाराखडी गिरवली त्याच जळगावात पराभवाचं संकट का दिसतंय? उन्मेश पाटील या एका नावानं महाजनांना कसं चक्रव्यूव्हमध्ये अडकवलंय? तेच पाहुयात
भाजपला एक हाती विजय मिळवून देणाऱ्या जळगावात (Jalgaon Lok Sabha Election 2024) यंदाही वारं कमळाच्याच दिशेनं होतं. मतदारसंघात भाजपच्या खासदारांची फौज आणि महायुतीची ताकद असल्यानं सगळेच निर्धास्त होते. याउलट शिवसेना फुटल्यानं जळगावातील सर्वच प्रमुख नेत्यांची फळी ही शिंदेंच्या बाजूने झुकली होती. महाविकास आघाडीकडे जळगावातून उभा करावा असा एकही स्ट्रॉंग कैंडिडेट नव्हता. थोडक्यात जळगावची लढत ही भाजपासाठी सोपी होती… मग महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी जाहीर झाली. या यादीवरून नजर फिरवल्यावर सर्वांना धक्का बसला तो जळगावची उमेदवारी पाहून… भाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊ केली. ही गोष्ट उन्मेष पाटलांचं राजकीय खच्चीकरण करणारी होती… उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीला गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा विरोध होता. त्यांनी आधीपासूनच उन्मेष चव्हाण यांचा पत्ता कट होणार, असं वातावरण तयार केलं होतं. आणि अखेर झालंही तसंच… मग याच उन्मेष पाटलांनी भाजपला मोठा धक्का देत ठाकरे गटात प्रवेश केला. इतकच नाही तर शिवधनुष्य बांधायला आपल्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांना घेऊन घेले…या सगळ्यात धनुष्यबान हातात घेऊन उन्मेष पाटील मैदानात उतरतील असं वाटत असताना पाटलांनी करण पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह केला.. आणि अखेर स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत फिक्स झाली…
भाजपने जळगावची सारी भिस्त ज्या महाजनांच्या खांद्यावर टाकली होती, त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका होता. महाजनांच्या हस्तक्षेपामुळेच उन्मेष पाटलांचं बंड झालं आणि जळगावात भाजप बॅकफुटला गेली, हे सरसकट बोललं जाऊ लागलं. खरंतर कागदावर बघायला गेलं तर जळगावात महायुतीची ताकद ही जास्त दिसते. महाविकास आघाडी जिल्ह्यात नाहीत जमा आहे. पण उन्मेष पाटील यांच्या येण्यानं जिल्ह्याचं राजकारण 360 अंशात बदलून गेलंय.. उन्मेष पाटील आणि करण पवार यांचं मूळ भाजपचंच असल्यानं येत्या काळात पक्षाकडून आपल्या विरोधात कशा स्टेटर्जी आखल्या जातील? याची दोघांनाही आधीपासूनच थोडीफार कल्पना आहे.
शिवाय, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव, चोपडा, अमळनेर यांसह इतर विधानसभा मतदारसंघांतील खासदार पाटील यांचा चांगला जनसंपर्क, शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभासाठी केंद्र व राज्य सरकारकडे केलेले प्रयत्न, संसदेतील उत्तम कामगिरी, पाडळसरे प्रकल्प, बोदवड उपसा सिंचन योजना, विमानतळ यांसह विविध प्रकल्पांच्या कामांना दिलेली गती या सगळ्यांचा पवारांच्या प्रचाराला फायदा होणार आहे, हे स्पष्ट दिसतंय. उन्मेष पाटील यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच विकासाची लाईन गडद करत टार्गेटवर ठेवलं ते गिरीश महाजनांना… महाजनांची जिल्ह्यात तयार झालेली संकट मोचकाची प्रतिमा खोडून काढून ते जिल्ह्यासाठी कसे संकट आहेत? हे मतदारांवर बिंबवत आहेत. थोडक्यात गिरीश महाजनांच्या इमेजला डॅमेज केलं की आपोआप स्मिता वाघ यांच्या मतदानावरही त्याचा इम्पॅक्ट होणार, हे गणित पाटलांना पक्क ठाऊक झालय… दुसऱ्या बाजूला उन्मेष पाटील यांच्या या खेळीने महाविकास आघाडीच्या गोटातही बारा हत्तींचं बळ आलय. उद्धव ठाकरेंनी जळगावात आपली यंत्रणा जोरात कामाला लावलीय. प्रचार सभांचाही चांगलाच जोर दिसतोय. त्यात ठाकरे गटाने जळगावच्या विजयाची नसही अचूक हेरलीय ती म्हणजे शेतकरी प्रश्नांची… दुधाचा भाव, पिक विमा, केळी उत्पादनाचे प्रश्न यावरून मविआचे नेते जळगावात भाजपाला धारेवर धरून जनमत आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करतायत… ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ अशी म्हण मराठीत रूढ आहे ती अगदी तंतोतंत सध्या करण पवार आणि ठाकरेंसाठी जळगावत तरी लागू होतेय, असं म्हणायला हरकत नाही…
या सगळ्यात गिरीश महाजन अचानकच जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे थंडे पडलेत. नाथाभाऊ पक्षात आल्यापासून भाजपतील अंतर्गत गोंधळ चांगलाच वाढला आहे. पक्षांचं केडरही मतदारसंघात म्हणावा इतका आक्रमकपणे काम करताना दिसत नाहीये. हे सगळं कॅल्क्युलेशन नीट केलं तर जळगावात मशालीला निवडून येण्यासाठी फुल स्कोप आहे… जर का असं झालं तर गिरीश महाजनांसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनू शकतो. मोठ्या कष्टानं आणि संयमानं जिल्ह्याच्या राजकारणावर होल्ड मिळवूनही खासदारकी हातातून जात असेल तर गिरीश महाजनांच्या राजकीय कारकीर्दीवर यामुळे संकट येऊ शकतं.. म्हणूनच जळगावची लढाई कमळ विरुद्ध मशाल इतकीच मर्यादित नसून यावर अनेकांची राजकीय भविष्य अवलंबून आहेत, हे काही वेगळं सांगायला नको… बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.