Jalgaon News: जळगावकरांसाठी आता एक खुशखबर आहे. भारत सरकाराची कंपनी असलेल्या अलायन्स एअर कडून जळगाव -मुंबई सेवा लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. खरेतर जळगाव ते मुंबई या मार्गावर हवाई सेवा सुरु व्हावी अशी मागणी उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला आता यश मिळाले असून लवकरच ही विमान सेवा (Jalgaon News) सुरु होणार आहे.
किती होतील उड्डाणे (Jalgaon News)
अलायन्स एअर कडून जळगाव-मुंबई ही विमानसेवा 16 जून पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोन वेळा ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव -मुंबई हवाईसेवा सुरु झाल्यामुळे व्यापारी आणि व्यवसायिकांचा वेळ वाचणार आहे. सध्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी ट्रॅव्हल्स आणि सरकारी बाय रोड वाहनांचा वापर करावा लागतो. यासाठी बराच वेळ लागतो. विमान सेवा सुरु झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 31 मे रोजी जळगाव-मुंबई विमानसेवेला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून (Jalgaon News) हिरवा कंदील मिळाला होता. सोबतच या सेबाबतचा डिजिटल बॅनर देखील प्रसिद्ध करण्यात आला होता.
लवकरच जळगाव-अहमदाबाद विमानसेवा (Jalgaon News)
मुंबईप्रमाणे गुजरात येथील अहमदाबाद मध्ये देखील उद्योग व व्यापार तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची (Jalgaon News) संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार, अलायन्स एअर कंपनीकडून जळगाव-अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार असून, याची लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे.