Jalna Lok Sabha 2024 : रावसाहेब दानवे खासदारकीचा सिक्सर मारणार कि कल्याणराव काळे जुना हिशोब चुकता करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंटला आलेला विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि ज्या गावातून त्यांनी मराठा आरक्षणाचा जो महाएल्गार उभा केला ते आंतरवाली सराटी. या सगळ्यामुळे माध्यमांमध्ये आणि सबंध महाराष्ट्रात कधी नव्हे ती जालना जिल्ह्याची (Jalna Lok Sabha 2024) चर्चा झाली. मराठवाड्यातील असणारा खेड्यापाड्यांनी आणि शेतीवर श्वास घेणारा हा जिल्हा. मात्र याच जालन्याचा स्वतःचा असा एक खास राजकीय विक्रम आहे तो म्हणजे एकाच व्यक्तीला लोकसभेच्या तब्बल सलग पाच टर्म निवडून देण्याचा. होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय. लोकसभेवर जालना मतदारसंघातून सलग पाच टर्म निवडून जाण्याचा हा पराक्रम केलाय भाजपच्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी. विरोधी पक्षाला नावाला सुद्धा न ठेवणाऱ्या दानवेंच्या राजकारणातील यशाचं नेमकं गमक आहे तरी काय? जालन्यात हातपाय मारून सुद्धा काँग्रेस यशाच्या जवळही जाताना का दिसत नाही? मराठा आरक्षणामुळे पेटलेल्या वातावरणात दानवे यांना याचा काही फटका बसू शकतो का? या सगळ्याचे डिकोडींग आज आपण जाणून घेऊयात..

महाराष्ट्राच्या पॉवर पॉलिटिक्सचा अचूक अंदाज कुणाला आलेला असेल तर तो जालन्याचे खासदार आणि कॅबिनेट मंत्री रावसाहेब दानवे यांना. कोणतेही राजकीय पाठबळ पाठीशी नसताना ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आता कॅबिनेट मंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचलीय. मध्यमवर्गीय माणसाला अशक्य वाटावा अशा दानवे यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना सर्वात जास्त तारुण नेलं ते जालना लोकसभा मतदारसंघाने… 1999 मध्ये भाजपच्या चिन्हावर त्यांना सलग पाच वेळा निवडून देण्यात आणि त्यांच्यावर विश्वास टाकण्यात जालनाकरांचा मोठा वाटा राहिलाय.जालना लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड , पैठण, फुलंब्री या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाला तर यातला एक मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच यंदाही भाजपला ही निवडणूक आरामशीर जाणार असून दानवेंचा खासदारकीचा सिक्सर अखेर पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत.

Jalna LokSabha : विरोधकांना प्रतिस्पर्धीच मिळेना; दानवेंचं आव्हान रोखणार तरी कोण?

मात्र दानवे यांच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांचे.. कल्याण काळे (Kalyan Kale) हे माजी आमदार असून 2009 साली त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा केवळ 8 हजार मतांनी पराभव झाला होता. आता कल्याणराव काळे यांच्या महाविकास आघाडीची भक्कम साथ असणार आहे. इतक्या वर्ष खासदार असूनही धोरणात्मक पातळीवर आणि जालन्याचा म्हणावा असा विकास दानवेंना करता आलेला नाहीये. त्यामुळे यंदाची निवडणूक दानवेंना जरा काळजीपूर्वकच हाताळावी लागेल. त्यातच भरीस भर म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जालन्यातील अंतरवाली सराटी मधून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा पेटवलेला प्रश्न दानवेंना जड जाऊ शकतो. मतदार संघातील मराठा समाजाचे मत विभागली गेली, तर अर्थात त्याची मोठी किंमत दानवेंना भोगावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? रावसाहेब दानवे यंदा विजय मिळवून खासदारकीचा सिक्सर मारतील? कि कल्याणराव काळेदानवेंचा विजयरथ रोखतील? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा..